‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 06:16 PM2018-12-31T18:16:39+5:302018-12-31T18:24:40+5:30

कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. 

'Golden Triangle' project are in trouble; Road work announced for Marathwada slow down | ‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने

‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने

googlenewsNext
ठळक मुद्दे- चौपदरीकरणाची कामे द्विपदरी 

औरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्लॅनमधील सुमारे १४ हजार कोटींची कामे ‘पीडब्ल्यूडी’,‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग केली. मात्र, ही कामे या सर्व विभागांच्या कचाट्यात अडकली आहेत. कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. 

चौपदरीकरणासाठी नियोजित केलेल्या रस्त्यांवर १० हजार वाहनांपेक्षा जास्त वाहतूक असूनही ते रस्ते द्विपदरी, तीनपदरी करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घोषणेला २५ डिसेंबर रोजी ३ वर्षे पूर्ण झाली. सदरील कामांवर एकत्रितपणे कोणत्याही संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे कुठे काय चालले आहे, हे काही समजण्यास मार्ग नाही. गोल्डन ट्रँगल कामांच्या घोषणेनंतर वर्षभरातच त्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. सीआरएफ, एनएचएआय, पीडब्ल्यूडी आणि आता एमएसआरडीसी मिळून हा दळणवळण विकास कार्यक्रम राबविण्याचे ठरले असून, सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात आहे. गडकरींच्या घोषणेतील बहुतांश रस्ते द्वि आणि तीनपदरीकरणात वर्ग केली आहेत. सोलापूर ते धुळे महामार्गदेखील आणखी एक ते दीड वर्ष पूर्ण होणे शक्य नाही. एमएसआरडीसीकडे वर्ग केलेली कामे प्रगतिपथावर आहेत. एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीकडील कामांबाबत काही सांगता येणार नाही, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले. 

कुणीच काही सांगेना
१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांंची खिचडी झाली आहे. औरंगाबाद ते फुलंब्रीमार्गे सिल्लोड ते पहूर ते जळगाव हा १५५ कि़मी.चा १५५० कोटींचा रस्ता एमएसआरडीसीच्या यादीत आहे. औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते मुक्ताईनगर हा ४०१ कि़मी. रस्ता ४ हजार १० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्या कामाचे काय झाले, हे जाहीरपणे कुणीही सांगत नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते नाशिक १८३ कि़मी. रस्ता १८३० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, माहिती नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगावमार्गे शिर्डी हा १५० कि़मी. रस्ता १५०० कोटींतून होईल, असे जाहीर करण्यात आले. औरंगाबाद ते परभणी या १२५० कोटींच्या १२५ कि़मी. रस्त्याचा आहे. हाच रस्ता खामगांव ते सांगोला यामार्गे असून ४५०० कोटींतून ४५० कि़मी. तो रस्ता करण्याचे दाखविण्यात आले. ही कामे सुरू आहेत का? हे सांगण्यास संबंधित विभाग पुढे येत नाही, तर सेना-भाजपचे लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

Web Title: 'Golden Triangle' project are in trouble; Road work announced for Marathwada slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.