औरंगाबादेत श्रद्धेने गुड फ्रायडे साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:28 AM2018-03-31T00:28:40+5:302018-03-31T11:18:29+5:30

आज गुड फ्राय डे. शहरातील सर्वपंथीय चर्चमध्ये श्रद्धा भावनेने आजचा हा दिन साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी यानिमित्त मोलाचा संदेश देऊन मार्गदर्शन केले. प्रार्थना झाली. सर्वच चर्चमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती.

Good Friday celebrates reverence in Aurangabad | औरंगाबादेत श्रद्धेने गुड फ्रायडे साजरा

औरंगाबादेत श्रद्धेने गुड फ्रायडे साजरा

googlenewsNext
ठळक मुद्देधर्मगुरूंचे मोलाचे मार्गदर्शन : सर्वपंथीय चर्चमध्ये भाविकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आज गुड फ्राय डे. शहरातील सर्वपंथीय चर्चमध्ये श्रद्धा भावनेने आजचा हा दिन साजरा करण्यात आला. धर्मगुरूंनी यानिमित्त मोलाचा संदेश देऊन मार्गदर्शन केले. प्रार्थना झाली. सर्वच चर्चमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती.
मानवी जीवन सार्थक करणारे शब्द...
वधस्तंभावर येशू ख्रिस्ताने उच्चारलेले सात शब्द मानवी जीवन सार्थक करणारे आहेत. कारण येशूने वधस्तंभावरून वैऱ्यावर प्रीती करण्याचा संदेश दिला. वैºयांना क्षमा करण्याचा संदेश दिला. मानवाने मानवाशी समानतेने वागण्याचा संदेश दिला, असे उद्गार छावणी येथील ख्राईस्ट चर्चमध्ये अंबरनाथ ख्राईस्ट चर्चचे फादर के. बी. लोंढे यांनी दिला. यावर्षी ते संदेश देण्यासाठी खास वक्ते म्हणून उपस्थित होते.
त्यांनी आणखी सांगितले की, मानवी जीवन हे दया, क्षमा, शांती, एकमेकांना सन्मान, वडीलधाºयांना सन्मान यांनी भरलेले असले पाहिजे. मानवाने स्वत:ही जगावे व इतरांनाही जगवावे. सर्व भेदभाव, जातीयवाद, प्रांतवाद, भाषावाद, यापासून दूर राहावे. जशी देवाने आपणावर प्रीती केली, तशीच प्रीती अखिल मानवजातीवर, प्राणीमात्रावर व निसर्गावर करावी.
सकाळी ११.३० ते यादरम्यान सर्वच चर्चमध्ये संदेश व प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. ख्राईस्ट चर्च, छावणी येथे फादर आर. बी. राठोड व फादर एस. एस. बत्तीसे यांची विशेष उपस्थिती होती. डॅनियल अस्वले, अर्चना राठोड, कौशल्या नाडे, शालिनी वाघमारे, महेश श्रीसुंदर, रमेश वडागळे, बिपीन इंगल्स यांनी शास्त्र वाचन केले. सुमारे पाच हजार भाविकांची यावेळी उपस्थिती होती. या चर्चचे सचिव जेम्स अंबिलढगे, खजिनदार डॅनियल अस्वले, प्रशांत तिडके, प्रदीप ताकवाले, विजय श्रीसुंदर, कालिंदी खेत्रे, महिला मंडळ, तरुण संघ, क्वायर ग्रुप, संडे स्कूल व स्वयंसेवकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सेंट फिलिफ चर्चमध्ये रेव्हरंड डॉ. बोर्डे यांनी संदेश दिला.
पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी
ख्राईस्ट चर्च, छावणी येथे ‘पाहिला का प्रभू ख्रिस्त खिळलेला खांबावरी’, करी क्षमा या जना बापा, प्रभू वैभवाने येशील माघारा, कैसा दु:खाचा घाला, प्रभू मजसाठी हो दु:खी बहु झाला, पाणी द्या पाणी, प्रभू दीन बंधू नाथ, क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा, अशी सात शब्दांवरची गीते गायली गेली. ‘हे बापा यांना क्षमा कर. कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही’ अशा शब्दांत येशू ख्रिस्ताने त्यांचा छळ करणाºयांसाठी केलेल्या प्रार्थनेने जगाला क्षमेचा मार्ग दाखविला.
यासह इतर सहा शब्दांमधून मानव कल्याणाचा, विश्वबंधुत्वाचा आणि नवीन समाजव्यवस्थेच्या स्थापनेचा संदेश दिला. दोन हजार वर्षांपूर्वी धर्म निंदेच्या नावाखाली येशू ख्रिस्तांविरुद्धच्या प्रदीर्घ न्यायालयीन प्रक्रि येनंतर येशूविरुद्ध मरणदंडास पात्र असा गुन्हा होत नसल्याचा निर्वाळा दिला गेला. मात्र तथाकथित धर्ममार्तंडांच्या दबावाखाली येशूला वधस्तंभावर बळी देण्यात आले. त्यावेळी येशूंनी उच्चारलेल्या सात शब्दांच्या अनुषंगाने आज विविध चर्चमध्ये संदेश देण्यात आले.

Web Title: Good Friday celebrates reverence in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.