आनंदवार्ता ! औरंगाबादेत ४० रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत १३२ नागरिकांचा कोरोनावर विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 08:00 PM2020-05-11T20:00:14+5:302020-05-11T20:01:58+5:30
किलेअर्क येथील मनपाच्या कोव्हिड केयर सेंटर येथून एकूण ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.
औरंगाबाद : शहरात सोमवारी आणखी ४० रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरात आतापर्यंत १३२ नागरिकांची कोरोनावर विजय मिळविला आहे.
जिल्हा रुग्णालयातून सोमवारी कोरोनामुक्त झालेल्या चाैघांना सुटी देण्यात आली. यात नुर काॅलनी येथील चार वर्षाची मुलीसह ३५ वर्षीय पुरुष, तर संजयनगर येथील ४८ वर्षीय पुरुषासह ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. यावेळी जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी, डाॅ. भारती नागरे, डाॅ. पद्मा बकाल, डाॅ. पद्मजा सराफ यांची उपस्थिती होती.
दुसरीकडे किलेअर्क येथील मनपाच्या कोव्हिड केयर सेंटर येथून एकूण ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. यात संजयनगर (२), नूर कॉलोनी (६), किलेअर्क (३), असेफिया कॉलोनी (१०), गुलाबवाडी (१), जयभीम नगर (१), बायजीपुरा (५), वडगाव (१), रोशन गेट (५) आणि कैलाश नगर (२) या भागातील रुग्णांचा समावेश आहे. यात २१ पुरूष आणि १५ महिलांचा समावेश आहे