खुशखबर! औरंगाबादहून आखाती देशांना थेट विमानसेवेसाठी हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 06:06 PM2022-06-02T18:06:20+5:302022-06-02T18:06:47+5:30

उमरा यात्रेबरोबरच मराठवाड्यातील परदेशी पर्यटक, उद्योगपती, व्यापारी आणि निर्यातदारांच्या दृष्टीनेही आखाती देशांना विमानसेवा सुरू होणे फायदेशीर ठरू शकते.

Good news! Efforts for Aurangabad to Gulf countries for direct flights | खुशखबर! औरंगाबादहून आखाती देशांना थेट विमानसेवेसाठी हालचाली

खुशखबर! औरंगाबादहून आखाती देशांना थेट विमानसेवेसाठी हालचाली

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादहून ‘उमरा’ यात्रेसह आखाती देशात जाण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून हालचाली सुरू आहेत. यादृष्टीने बुधवारी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उमरा टुर्स ऑपरेटर्स आणि विमानतळाच्या अधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली.

बैठकीस विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष व उद्योजक सुनीत कोठारी, ‘एटीसी’चे सहायक महाव्यवस्थापक विनायक कटके, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांच्यास मराठवाड्यातील उमरा टुर्स ऑपरेटर्स उपस्थित होते. औरंगाबादहून दर महिन्याला ७०० ते ८०० भाविक हे उमरा यात्रेसाठी जातात. आजघडीला त्यांना मुंबईहून जावे लागते. उमरा यात्रेसाठी औरंगाबादहूनच थेट विमानसेवा सुरू झाल्यास मुंबईला जाण्याचा खर्च वाचण्यास मदत होईल. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. उमरा यात्रेबरोबरच मराठवाड्यातील परदेशी पर्यटक, उद्योगपती, व्यापारी आणि निर्यातदारांच्या दृष्टीनेही आखाती देशांना विमानसेवा सुरू होणे फायदेशीर ठरू शकते.

आखाती विमान कंपन्यांकडे पाठपुरावा
मराठवाड्यातील सर्व टुर ऑपरेटर्सकडून प्रवाशांच्या संख्येची माहिती प्राप्त झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरण, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन विविध आखाती विमान कंपन्यांबरोबर पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Good news! Efforts for Aurangabad to Gulf countries for direct flights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.