सुशिक्षित बेरोजगारांसाठी खूशखबर, मराठवाड्यात ५८ मेळाव्यातून मिळणार रोजगाराच्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 07:32 PM2023-01-02T19:32:48+5:302023-01-02T19:33:07+5:30

औरंगाबादेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत प्रत्येकी ४ व मार्च महिन्यात २ मेळावे होतील.

Good news for the educated unemployed, employment opportunities will come from 58 job fairs in Marathwada | सुशिक्षित बेरोजगारांसाठी खूशखबर, मराठवाड्यात ५८ मेळाव्यातून मिळणार रोजगाराच्या संधी

सुशिक्षित बेरोजगारांसाठी खूशखबर, मराठवाड्यात ५८ मेळाव्यातून मिळणार रोजगाराच्या संधी

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जानेवारी ते मार्च, २०२३ या कालावधीत जिल्हानिहाय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने ५८ मेळाव्यांचे आयोजन केल्याचे विभागीय प्रशासनाने कळविले आहे. नववर्षातील सुरुवातीच्या तीन महिन्यांत रोजगाराच्या मोठ्या संधी यातून मिळणार आहेत.

औरंगाबादेतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत प्रत्येकी ४ व मार्च महिन्यात २ मेळावे होतील. जालन्यात जानेवारीत २, फेब्रुवारीत १ व मार्चमध्ये १ मेळावा, परभणीत जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत प्रत्येकी २ मेळावे, हिंगोलीत जानेवारीत २, फेब्रुवारीत ३ व मार्चमध्ये २ मेळावे होतील. नांदेडमध्ये जानेवारीत २, फेब्रुवारीत ३ व मार्चमध्ये २ मेळावे, लातूरमध्ये जानेवारी २, फेब्रुवारी १ व मार्च २ मेळावे होतील. उस्मानाबादमध्ये जानेवारी ४, फेब्रुवारी ३ व मार्च २ मेळावे होतील. बीडमध्ये जानेवारी ४, फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी ३ मेळाव्यांचे आयोजन केले आहे. जानेवारी ते मार्च, २०२३ या कालावधीत ५८ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पोर्टलवर मिळणार माहिती
रोजगार मेळाव्याची अपडेट माहिती विभागाच्या वेबपोर्टल https://www.rojgarmahaswayam.gov.in वर देण्यात येईल. इच्छुकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय आयुक्तालय, उपायुक्त कौशल्य विकास विभागाने केले आहे.

Web Title: Good news for the educated unemployed, employment opportunities will come from 58 job fairs in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.