गुड न्यूज! औरंगाबादहून आता रेल्वेने रोज जा पुण्याला; नांदेड-हडपसर रेल्वेचा झाला विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:18 PM2022-06-30T13:18:00+5:302022-06-30T13:23:03+5:30

४ जुलैपासून नियमित धावणार रेल्वे, ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

Good news! From Aurangabad now go to Pune daily by train; The Nanded-Hadapsar railway was expanded | गुड न्यूज! औरंगाबादहून आता रेल्वेने रोज जा पुण्याला; नांदेड-हडपसर रेल्वेचा झाला विस्तार

गुड न्यूज! औरंगाबादहून आता रेल्वेने रोज जा पुण्याला; नांदेड-हडपसर रेल्वेचा झाला विस्तार

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादकरांना आता रेल्वेने दररोज थेट पुण्याला जाता येणार आहे. नांदेड - हडपसर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचा अखेर विस्तार पुण्यापर्यंत करण्यात आला असून, ४ जुलैपासून ही रेल्वे दररोज धावणार आहे. या रेल्वेची वेळही बदलण्यात आली आहे. रात्री प्रवास सुरू केल्यानंतर पहाटे ५.३० वाजता पुण्यात पोहोचता येणार आहे.

जानेवारीत नांदेड - पुणे द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचे रुपांतर नांदेड - हडपसर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये करण्यात आली. या रेल्वेच्या रचनेत बदल करून तिला एलएचबी कोचेस लावण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकावर नियोजित वेळेत रेल्वे थांबण्यासाठी प्लॅटफाॅर्म उपलब्ध नसल्याने हडपसर येथेच थांबा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, हडपसर ते पुणे स्टेशन दरम्यान लोकल नसल्याने शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड अथवा लोणावळ्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. ‘लोकमत’ने २८ फेब्रुवारी रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित करून ही बाब समोर आणली.

विशेष म्हणजे आता ही रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी रात्री धावणार आहे. नांदेड - पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकावरून दररोज दुपारी ३.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता पुणे स्टेशनला पोहोचेल. तर पुणे - नांदेड एक्स्प्रेस पुणे स्टेशनवरून रात्री ९.३५ वाजता सुटेल आणि सकाळी १०.२० वाजता नांदेड येथे पोहोचेल.

औरंगाबाद स्थानकावरील वेळ
नांदेड - पुणे एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर रात्री ८.२० वाजता येईल. रात्री ८.२५ वाजता ही रेल्वे रवाना होईल आणि पुण्याला पहाटे ५.३० वाजता पोहोचेल. पुणे - नांदेड एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावर पहाटे ५.०५ वाजता येईल आणि ५.१० वाजता नांदेडकडे रवाना होईल.

Web Title: Good news! From Aurangabad now go to Pune daily by train; The Nanded-Hadapsar railway was expanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.