गोपीनाथ मुंडे संस्थेचा गाशा गुंडाळावा लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 06:10 AM2018-03-13T06:10:29+5:302018-03-13T06:10:48+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेला २०१८-१९च्या अर्थसंकल्पातही ठेंगा दाखविण्यात आला आहे.

Gopinath Munde's organization will have to rebuild | गोपीनाथ मुंडे संस्थेचा गाशा गुंडाळावा लागणार

गोपीनाथ मुंडे संस्थेचा गाशा गुंडाळावा लागणार

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेला २०१८-१९च्या अर्थसंकल्पातही ठेंगा दाखविण्यात आला आहे. शिवाय, राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेली १५० कोटी रुपयांची रक्कमही न मिळाल्याने, या संस्थेचा गाशा गुंडाळण्याची पाळी विद्यापीठ प्रशासनावर आली आहे.
गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने विद्यापीठात ग्रामीण भागातील समस्यांवर संशोधन करणारी संस्था २०१५ साली स्थापन केली. ४ आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संस्थेच्या पायाभूत सुविधांसाठी, राज्य सरकारने १५० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, तेव्हापासून सरकारने कवडीही दिलेली नाही.
संस्थेला निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. मात्र, राज्य सरकारने निधीची तरतूद केली नाही, असे गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे संचालक डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title: Gopinath Munde's organization will have to rebuild

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.