बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 07:42 PM2018-10-18T19:42:41+5:302018-10-18T19:43:11+5:30
कर्तव्यावर असताना वडिलांचे निधन झाल्याने महावितरण कंपनीत अनुकंपा तत्त्वावर शिक्षणाची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले. हा खोटेपणा अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरोधात थेट पोलिसांत फिर्याद नोंदविली. शेख मोहसीन अहेमद नबी (रा. ईदगाहनगर, ता. सिल्लोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
औरंगाबाद : कर्तव्यावर असताना वडिलांचे निधन झाल्याने महावितरण कंपनीत अनुकंपा तत्त्वावर शिक्षणाची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले. हा खोटेपणा अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्याच्याविरोधात थेट पोलिसांत फिर्याद नोंदविली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक करून लॉकअपमध्ये टाकले. शेख मोहसीन अहेमद नबी (रा. ईदगाहनगर, ता. सिल्लोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी सांगितले की, शेख मोहसीनचे वडीले हे महावितरणमध्ये नोकरीला होते. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. शासनाच्या धोरणानुसार मृत सरकारी कर्मचाºयाच्या एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत घेतले जाते. त्यानुसार मोहसीनने महावितरणकडे नोकरीसाठी अर्ज सादर केला होता. त्याच्या अर्जासोबत त्याने सादर केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांची महावितरणच्या अधिकाºयांनी पडताळणी केली असता औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे बनावट प्रमाणपत्र त्यात असल्याचे उघडकीस आले.
कार्यकारी अभियंता नामदेव गांधले यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक पी.पी. इंगळे यांनी तपास करुन शेख मोहसीन याला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती उपनिरीक्षक इंगळे यांनी सांगितले.