‘सरकार’ शहरात
By Admin | Published: October 4, 2016 12:35 AM2016-10-04T00:35:54+5:302016-10-04T00:51:15+5:30
औरंगाबाद : ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त राज्य सरकार शहरात येत आहे. अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले आहेत.
औरंगाबाद : ४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनिमित्त राज्य सरकार शहरात येत आहे. अनेक मंत्री आज सायंकाळपर्यंत शहरात दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय हेही आजच औरंगाबादेत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सकाळी १०. ३० वाजता येत आहेत. त्यांच्यासमवेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राहतील. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री व पर्यावरणमंत्री रामदास कदम, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे सायंकाळी शहरात दाखल झाले.
शिक्षणमंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आरोग्यमंत्री दीपक सावंत, जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सकाळीच विमानाने शहरात दाखल होत आहेत. एकूण ४० प्रधान सचिव व सचिवही बैठकीसाठी सकाळीच शहरात येतील.