शासकीय दंतविद्यालयाने वर्षभरात दातांत भरली साडेसहा किलो चांदी

By Admin | Published: June 20, 2017 07:11 PM2017-06-20T19:11:16+5:302017-06-20T19:11:16+5:30

चांदीच्या दागिन्यांची जेवढी लोकप्रियता आहे तेवढेच दंत उपचारातही चांदीला अनन्यसाधारण महत्व आहे. दात किडल्याने चांदी भरली असे नेहमीच ऐकण्यात येते. दंत आजारांच्या

The government dental college filled the toothpaste in the year | शासकीय दंतविद्यालयाने वर्षभरात दातांत भरली साडेसहा किलो चांदी

शासकीय दंतविद्यालयाने वर्षभरात दातांत भरली साडेसहा किलो चांदी

googlenewsNext

संतोष हिरेमठ /ऑनलाइन लोकमत 
औरंगाबाद, दि. 20 - आजघडीला सुमारे ३९ हजार रुपये प्रति किलोपर्यंत चांदीचा भाव आहे. चांदीच्या दागिन्यांची जेवढी लोकप्रियता आहे तेवढेच दंत उपचारातही चांदीला अनन्यसाधारण महत्व आहे. दात किडल्याने चांदी भरली असे नेहमीच ऐकण्यात येते. दंत आजारांच्या रुग्णांची संख्या पाहता रुग्णलायांमधून दातांमध्ये भरण्यात येणाऱ्या चांदीचेही प्रमाण मोठे आहे. एकट्या औरंगाबादेतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात वर्षभरात साडेतीन हजार रुग्णांच्या किडलेल्या दातांत तब्बल साडेसहा किलो चांदी भरण्यात आली आहे.
रुट कॅनॉल उपचार, दात-हिरड्यांमध्ये चांदी भरणे किंवा इतर वैद्यकीय साहित्यांचा वापर करून दात भरणे यासाठी खाजगी रुग्णालयांत उपचार घेणे गोरगरीबर, सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. परंतु शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय अशा रुग्णांना दंत उपचारासाठी आशेचा किरण ठरत आहे. घाटी रुग्णालयालगत असलेल्या या दंत रुग्णालयाकडे रुग्णांची पावले वळतात. दातांसाठी अपायकारक असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण अलीकडे वाढलेले दिसते. त्यामुळे लहान मुलांपासून वृद्धांमध्ये दात किडन्याचे प्रमाण दिसून येते. यातून अन्नपदार्थ चावण्यास अडचण निर्माण होते.
दंत रुग्णालयात सर्व प्रकाराचे अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत. त्यामुळे दररोज या ठिकाणी शहरासह जिल्ह्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. उपचारासाठी अनेक रुग्णांच्या दात आणि हिरड्यात चांदी भरण्याची वेळ येते. लहान मुलांसह प्रौढ, ज्येष्ठांच्या दातांतही चांदी भरली जाते. दातांमध्ये भरलेली चांदी अनेक वर्षे टिकते. चांदीसह इतर मिश्रणाचाही वापर केला जातो. महिन्याला दोनशे ते तीनशे रुग्णांच्या दातात येथील रुग्णालयातील तज्ज्ञ चांदी भरतात.

वर्षभरात ३,६१० रुग्ण
मागील वर्षभराच्या कालावधीत ३ हजार ६१० रुग्णांच्या किडलेल्या दातांमध्ये चांदी भरण्यात आली आहे. किडलेल्या दाताच्या आकारानुसार चांदीचे प्रमाण ठरवले जाते.

अडिच लाखांची चांदी
दंत महाविद्यालयास ३० ग्रॅमच्या छोट्याशा डब्बीमध्ये चांदी मिळते. वर्षभरात अशा २२० डब्बींतील म्हणजे ६ हजार ६०० ग्रॅम चांदी रुग्णांच्या दातांमध्ये भरल्या गेली. सध्याच्या ३९ हजार रुपये प्रति किलोपर्यंत चांदीच्या दराने ही सुमारे अडिच लाखांची चांदी होते.

चार किलो सिमेंट
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे म्हणाले, चांदीसह दातांमध्ये सिमेंटही भरण्यात येते. गेल्या वर्षभरात सुमारे चार किलो सिमेंट दातांमध्ये भरण्यात आले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक दंतोपचार देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

Web Title: The government dental college filled the toothpaste in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.