दिव्यांगांना दिलेल्या सरकारी ई-रिक्षा पडल्या बंद,बच्चू कडूंनी कंपनी कर्मचाऱ्याला लगावला ठोसा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:29 AM2024-08-09T06:29:27+5:302024-08-09T06:33:43+5:30

कंपनीने दिलेल्या रिक्षा चढावावर चढत नाहीत. बॅटरी चार्ज होत नाही. रिक्षा पलटी होत आहेत, अशा तक्रारी लाभार्थ्यांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नेमके कारण काय, हे समजून घेण्यासाठी बाेलावले होते. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हा प्रकार घडला, असे आ. कडू यांनी सांगितले.

Government e-rickshaws given to the disabled stopped, Bachu Kadu punched the company employee | दिव्यांगांना दिलेल्या सरकारी ई-रिक्षा पडल्या बंद,बच्चू कडूंनी कंपनी कर्मचाऱ्याला लगावला ठोसा

दिव्यांगांना दिलेल्या सरकारी ई-रिक्षा पडल्या बंद,बच्चू कडूंनी कंपनी कर्मचाऱ्याला लगावला ठोसा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे दिव्यांगांना देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक रिक्षांच्या दर्जावरून आ. बच्चू कडू यांनी ‘तेजस’ या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. गुरुवारी सायंकाळी सुभेदारी विश्रामगृहात ही घटना घडली. 

कंपनीने दिलेल्या रिक्षा चढावावर चढत नाहीत. बॅटरी चार्ज होत नाही. रिक्षा पलटी होत आहेत, अशा तक्रारी लाभार्थ्यांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नेमके कारण काय, हे समजून घेण्यासाठी बाेलावले होते. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हा प्रकार घडला, असे आ. कडू यांनी सांगितले. रिक्षांच्या तांत्रिक अडचणींबाबत चौकशी सुरू असल्याचे दिव्यांग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांनी सांगितले.
 

Web Title: Government e-rickshaws given to the disabled stopped, Bachu Kadu punched the company employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.