शासकीय कर्मचारी, तरीही आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:03 AM2021-01-08T04:03:26+5:302021-01-08T04:03:26+5:30
हनुमान चौकात गतिरोधक बसवा औरंगाबाद : न्यू हनुमाननगर येथील हनुमान चौकातील रस्त्यावरील गतीरोधकांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अर्ध्या जागेत ...
हनुमान चौकात गतिरोधक बसवा
औरंगाबाद : न्यू हनुमाननगर येथील हनुमान चौकातील रस्त्यावरील गतीरोधकांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर अर्ध्या जागेत गतिरोधक आहे, तर अर्ध्या जागेतील गतिरोधक गायब झाले आहे. परिणामी चौकातून वेगाने वाहने नेण्याचा प्रकार होत आहे. अपघाताची भीती वाढत असल्याने येथे गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
रस्त्याच्या वळणावरच रिक्षांचा थांबा
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानक चौकातून समर्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावरच रिक्षांचा थांबा तयार झाला आहे. रस्त्याच्या डाव्या बाजूने वळन घेतल्यानंतर समोर अचानक रिक्षा येते. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक मारावा लागत आहे. त्यातून अपघाताचा धोका वाढत असल्याने रस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षांवर कारवाईची मागणी होत आहे.
मुकुंदवाडी स्टेशन
रस्त्याची दुरवस्था
औरंगाबाद : सिडको बसस्थानक चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना अक्षरश: यातना सहन कराव्या लागत आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवून होणारा त्रास थांबविण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.
आरटीओत पार्किंगसाठी
जागेची शोधाशोध
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या वाहनचालकांना सध्या वाहन उभे करण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागत आहे. जागा मिळत नसल्याने कार्यालय एका टोकाला आणि वाहन दुसऱ्या टोकाला उभे करण्याची वेळ येत आहे. संपूर्ण रस्ता दुचाकी, चारचाकींनी भरून जात आहे.