समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार अपयशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

By बापू सोळुंके | Published: October 15, 2023 02:17 PM2023-10-15T14:17:24+5:302023-10-15T14:18:23+5:30

भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दानवेंनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली, यानंतर घाटी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.

Government fails to prevent accidents on Samriddhi Highway; Criticism of Opposition Leader Ambadas Danve | समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार अपयशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार अपयशी; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची टीका

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर सतत घडणाऱ्या अपघातातून राज्य शासनाने कसलाही बोध घेतला नाही, संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराजवळ समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात नसून व्यवस्थात्मक पद्धतीने हत्या आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यास सरकार स्पशेल अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

समृद्धी महामार्गावर आज रात्री घडलेल्या भीषण अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दानवे यांनी सर्वप्रथम घटनास्थळी धाव घेतली .यानंतर त्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेस परिवहन विभाग जबाबदार असुन १७ जणांची क्षमता असताना ३५ ते ४० प्रवासी या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास कसा काय करत होते असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बुलढाणा येथे काही महिन्यांपूर्वी असाच मोठा अपघात घडला होता,त्यानंतर या घटनेची तीव्रता लक्षात घेत परिवहन विभागाने समृद्धी वरून जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करणे सुरू केले होते. परंतु लगेच ८ दिवसानंतर पुन्हा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हफ्तेखोरी साठी ही पध्दत बंद पडल्याची टीकाही त्यांनी केली.या अपघातासाठी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारला नागरिकांचे जीव स्वस्त वाटत आहेत का? समृद्धी महामार्गावर सतत लोकांचे बळी जात आहेत. याचे सरकारला गांभीर्य नाही का ? असे हफ्ते खोरीसाठी वाहने थांबवून लोकांचे बळी घेतलेत जात असेल तर ही खूप गंभीर बाब असल्याचे म्हणत दानवे यांनी व्यवस्थापनाच्या गलथान कारभारावर बोट ठेवले. 

चौकशी झाली पाहिजे 
दररोजच कोण - कोणत्या गोष्टींवर सरकारचा निषेध करावा. सर्वच बाबतीत सरकारी पातळीवरून असा हलगर्जीपणा होत आहे. तसेच समृद्धी महामार्गाची सुरक्षितता व अत्यावश्यक सुविधा वाढविणे गरजेचे आहे. हा रस्ता जलद प्रवासासाठी आहे तर या वाहनाला का थांबविले गेले? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.

Web Title: Government fails to prevent accidents on Samriddhi Highway; Criticism of Opposition Leader Ambadas Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.