सरकारकडे गोशाळेसाठी निधी आहे मात्र कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही; पी. साईनाथ यांची जोरदार टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 05:55 PM2018-01-18T17:55:35+5:302018-01-18T17:57:38+5:30

सरकारकडे शांतीनिकेतन या विद्यापीठात गोशाळा सुरु करण्यासाठी निधी आहे मात्र त्याच विद्यापिठातील कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही अशी टीका जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.  

The government has a fund for the goshala but not for the salaries of the employees;Vigorous criticism of P. Sainath | सरकारकडे गोशाळेसाठी निधी आहे मात्र कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही; पी. साईनाथ यांची जोरदार टीका 

सरकारकडे गोशाळेसाठी निधी आहे मात्र कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही; पी. साईनाथ यांची जोरदार टीका 

googlenewsNext

औरंगाबाद : सरकारकडे शांतीनिकेतन या विद्यापीठात गोशाळा सुरु करण्यासाठी निधी आहे मात्र त्याच विद्यापिठातील कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही अशी टीका जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.  

आज दुपारी एसएफआय या संघटनेच्या विद्यार्थी संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून पी. साईनाथ सहभागी होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले कि, रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन या केंद्रीय विद्यापीठाने गोशाला सुरू केली आहे. त्या गोशाळेत नुकत्याच 40 गायी आणण्यात आल्या आहेत. ही संख्या लवकरच 200 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. दुसरीकडे मात्र, त्याच विद्यापीठातील कर्मचारी व कामगारांचे पगार थकीत आहेत. हीच अवस्था देशातील सर्वच विद्यापीठाची झाली आहे अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. 

Web Title: The government has a fund for the goshala but not for the salaries of the employees;Vigorous criticism of P. Sainath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.