औरंगाबाद येथील एमआयएमच्या तीन गोंधळी नगरसेवकांना शासनाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:01 AM2018-02-16T00:01:10+5:302018-02-16T00:01:17+5:30

मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.

Government notice to three Mumbaist corporators of Aurangabad Municipal Corporation | औरंगाबाद येथील एमआयएमच्या तीन गोंधळी नगरसेवकांना शासनाची नोटीस

औरंगाबाद येथील एमआयएमच्या तीन गोंधळी नगरसेवकांना शासनाची नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देआठ दिवसांत खुलासा द्या : अन्यथा पद रद्द करण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या तीन नगरसेवकांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये मनपाच्या सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व असा गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावणे, राजदंड पळवून नेणे, सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की करणे आदी प्रकार या नगरसेवकांनी केले होते. या गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. याची गंभीर दखल घेत शासनाने गुरुवारी तिन्ही नगरसेवकांना नोटीस बजावली असून, त्यामध्ये आठ दिवसांत खुुलासा सादर करावा अन्यथा नगरसेवकपद रद्द करण्यात येईल, असे म्हटले आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने बजावलेल्या नोटीसमुळे एमआयएमच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
ज्या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे त्यात सय्यद मतीन (वॉर्ड क्र. २०-जयभीमनगर, घाटी), शेख जफर (वॉर्ड क्र. ६०- इंदिरानगर-उत्तर बायजीपुरा) आणि अपक्ष तथा एमआयएम समर्थक अजीम अहेमद (वॉर्ड क्र. ४३- शरीफ कॉलनी) यांचा समावेश आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये मावळते महापौर बापू घडमोडे यांची शेवटची सभा सुरू असताना एमआयएम नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. महापौरांसमोरील राजदंड ओढत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. अजीम अहेमद यांनी सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन खाली पाडले होते. त्यानंतर जफर यांनी थेट महापौरांच्या अंगावर प्लास्टिकच्या खुर्च्या भिरकावल्या होत्या. सय्यद मतीन यांनी राजदंड पळविला होता. या प्रकरणात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. मतीन आणि अजीम यांना सिटीचौक पोलिसांनी अटकही केली होती.
गोंधळी नगरसेवकांचा अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश तत्कालीन महापौर घडमोडे यांनी प्रशासनास दिले होते. मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी सभागृहात घडलेल्या घटनांचा सविस्तर तपशील शासनाच्या नगरविकास विभागाला सादर केला होता.
आणखी चार जणांचा समावेश
मनपा प्रशासनाने शासनाकडे एमआयएमच्या एकूण ८ नगरसेवकांचे अहवाल पाठविले आहेत. यातील काहींनी अतिक्रमण हटावात हस्तक्षेप केला आहे. अधिकाºयांवर हल्ला चढविणे, अतिक्रमण हटविताना विरोध दर्शविणे आदी आरोप एमआयएम नगरसेवकांवर आहेत. त्यातील तीन जणांनाच गुरुवारी शासनाने नोटीस बजावली आहे.

Web Title: Government notice to three Mumbaist corporators of Aurangabad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.