सरकारने एकात्मिक दुष्काळमुक्त धोरण आखावे
By Admin | Published: May 11, 2016 12:25 AM2016-05-11T00:25:21+5:302016-05-12T00:49:23+5:30
प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद वातावरणीय बदलांचा प्रश्न लक्षात घेत, केंद्र सरकारने २०१४ मध्ये स्वतंत्र वातावरणीय बदल खाते सुरू केले. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात वारंवार पडणारा दुष्काळ निवारण्यासाठी
लातूर : समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी तसेच आर्थिक तरतूदी अभावी ११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे़ महाविद्यालय स्तरावर ९ हजार ७०८ प्रस्ताव समाजकल्याण विभागात दाखलच झाले नाहीत़ शिवाय, समाजकल्याण कार्यालय स्तरावरून १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी रखडली आहे़
केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते़ लातूर जिल्ात २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात ४१ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील २९ हजार ७७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली़ २७ कोटी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना वितरीत झाली आहे़ जिल्ातील महाविद्यालयांकडून मात्र ९ हजार ७०८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आले नाहीत़ त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही प्रलंबित आहे़ चालू शैक्षणिक वर्षात संबंधीत महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत़ समाजकल्याण कार्यालय स्तरावर १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी प्रलंबित आहे़ ही शिष्यवृत्ती चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याचे समाजकल्याण कार्यालयातून सांगण्यात आले़ महाविद्यालयांकडून जे प्रस्ताव प्राप्त नाहीत़ त्यात त्रुटी आहेत़ तशा त्यांना सुचना करण्यात आल्या आहेत़ परीपुर्ण प्रस्ताव ऑनलाईन दाखल केल्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात तीही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अदा केली जाणार आहे, असेही समाजकल्याण विभागातून सांगण्यात आले़