सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:05 AM2021-07-07T04:05:06+5:302021-07-07T04:05:06+5:30

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि उद्योजक --- औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टीचा विस्तार होईल. मोठ्या धावपट्टीमुळे मोठी विमाने ...

The government should prioritize the expansion of the airport | सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घ्यावे

सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घ्यावे

googlenewsNext

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि उद्योजक

---

औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टीचा विस्तार होईल. मोठ्या धावपट्टीमुळे मोठी विमाने उतरणे शक्य होईल. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर भूसंपादन करून जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करावी. म्हणजे प्राधिकरण विमानतळाचे विस्तारीकरण करू शकतील.

---

कोरोनामुळे औरंगाबादच्या विमानसेवेला फटका बसला. दुसऱ्या लाटेत इंडिगोने विमानसेवा तात्पुरती रद्द केली. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरळीत होत आहे. दिल्ली, हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा उड्डाण घेत आहे. तर १२ जुलैपासून मुंबईची विमानसेवा सुरू केली जात आहे. या तीनही विमानसेवांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर अहमदाबाद आणि बंगळुरू विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. आर्थिक व्यवहार सुरळीत होत आहे. लसीकरण वाढत असल्याने विमान प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे औरंगाबादला पूर्वी सुरू असलेल्या विमानसेवा पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होतील, असा विश्वास आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घेतले पाहिजे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची भेट घेऊन हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाईल. विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यानंतर मोठी विमाने उतरू शकतील. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. मराठवाड्यातील शेतीमाल हा देशभरात आणि परदेशात गेला पाहिजे. कार्गो विमानसेवा सुरू झाली तर हे शक्य होईल. यासाठीही विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. देशात किसान उडान योजना सुरू आहे. मराठवाड्यात किसान रेल्वेबरोबर किसान उडान वाढले पाहिजे. त्यासाठीदेखील पाठपुरावा केला जाईल.

औरंगाबाद शहराला डॉप्लर वेदर रडार पाहिजे. शेतकऱ्यांना त्याद्वारे हवामानाचा अचूक अंदाज कळेल. सोबतच विमानसेवेलाही त्याचा फायदा होईल. यासाठी मिनिस्ट्री ऑफ अर्थ, सायन्स आणि डायरेक्टर जनरल ऑफ मेटॅरॉलॉजी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पर्यटनस्थळी जाण्याची परवानगी दिली पाहिजे. गेली दीड वर्षे नागरिक कुठेच गेलेले नाहीत. परदेशी पर्यटकही पर्यटनासाठी भारतात येण्यास इच्छुक आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पर्यटन चारपटीने वाढेल, असा विश्वास आहे.

Web Title: The government should prioritize the expansion of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.