नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण शासनाने करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:39 PM2018-12-25T23:39:45+5:302018-12-25T23:40:46+5:30
: सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता त्या निर्माण कराव्यात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी दिला.
औरंगाबाद : सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या नाहीत. उद्योगासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही. परिणामी, ग्रामीण महाराष्ट्राची पीछेहाट सुरूआहे. शासनाने शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या धर्तीवर राज्य शासनाने नोकरीबाह्य तरुणांचे सर्वेक्षण करावे. नोकºया नाहीत असे न सांगता त्या निर्माण कराव्यात, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी दिला.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर लिखित ‘भाऊ-दादी: साथी नव्या युगाचे’, ‘शैक्षणिक षटकार’, ‘माझा शालेय परिपाठ: भाग एक’, ‘शासकीय योजनांचा खजिना: कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’ या पाच पुस्तकांचे प्रकाशन सोमवारी बोराडे यांच्या हस्ते झाले. मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे व्यासपीठावर राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. बी. ए. चोपडे, प्रकुलगुरूअशोक तेजनकर, माजी विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, उपायुक्त डॉ. विजयकुमार फड यांची उपस्थिती होती.
यावेळी बोराडे म्हणाले की, डॉ. भापकर मनपाचे आयुक्त असताना त्यांनी सर्व्हे करून शाळाबाह्य मुले शोधून काढली होती. मात्र, आज राज्यामध्ये नोकरीबाह्य मुलांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राध्यापक होण्यासाठी एम.ए, सेट,नेटसारख्या सर्व पात्रता पूर्ण केल्या असतानाही नोकरी का मिळत नाही हा प्रश्न आहे. यावर शासनाने विचार करून त्यादृष्टीने पावले उचलावी, असेही त्यांनी मत व्यक्त केले. भापकर यांनी पाच पुस्तकांच्या माध्यमातून अनमोल ठेवा दिला आहे. ती पुस्तके नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतील, असा उल्लेखही त्यांनी केला. ग्रंथ ही संपत्ती असून या विचारांची संपत्ती कुणीही चोरू शकत नाही, असे मत प्रास्ताविकात बाबा भांड यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप भास्कर मुंडे यांनी केला. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.
चौकट
जे अनुभवतो तेच लिहितो
लेखनामागची भूमिका विशद करताना डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले की, मी जे रोज अनुभवतो तेच लेखनात उतरवले आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान यातून सामर्थ्य मिळत असते. त्या यंत्रणेला सोबत घेऊन काम करता येते. देशाला मजबूत करण्यासाठी मुलांना मजबूत केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.