मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:26 AM2018-01-28T00:26:27+5:302018-01-28T00:26:33+5:30

भारताच्या मजबूत संविधानामुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रात योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. यात मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी प्रजासत्ताकदिनी केले.

Governments are committed to the development of Marathwada | मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध

googlenewsNext
ठळक मुद्देदीपक सावंत : देवगिरी मैदानावर प्रजासत्ताकदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारताच्या मजबूत संविधानामुळे देशाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रात योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. यात मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी प्रजासत्ताकदिनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जनतेला उद्देशून डॉ. सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर, महापौर नंदकुमार घोडेले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
पुरस्कारांचे वितरण
ध्वजारोहणानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांनी परेडचे निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाºया जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक अब्दुल गफ्फार खान यांना पुरस्कार, पदक, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाच्या २३ पशुवैद्यकीय दवाखान्यांची आयएसओ नामांकनासाठी निवड झाल्याबद्दल त्यांनाही गौरविले. भारत स्काऊट गाईड कार्यालयातर्फे जय भवानी विद्यामंदिर, उद्धवराव पाटील विद्यालय, औरंगाबाद पब्लिक स्कूल आणि गोदावरी पब्लिक स्कूलच्या राज्य पुरस्कारप्राप्त स्काऊट गाईड यांना प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Governments are committed to the development of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.