सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:12 AM2017-09-18T00:12:07+5:302017-09-18T00:12:07+5:30

विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला

 Government's attempt to disrupt the cooperative sector- Ajit Pawar | सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न

सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. येथील समर्थ सहकारी बँकेच्या नूतन वास्तू स्थलांतरानिमित्त रविवारी आयोजित सभासद व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमास माजी मंत्री आ. राजेश टोपे, विक्रम काळे, रामराव वडकुते, माजी आ. कैलास गोरंट्याल, सुरेशकुमार जेथलिया, चंद्रकांत दानवे, कपिल आकात, डॉ. बी. आर. गायकवाड, सतीश टोपे, राजेश राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, की सहकार क्षेत्रात चांगले काम करणाºया संस्थांनी दीर्घकाळ परिश्रम घेऊन सहकार चळवळीला बळ देण्याचे काम केले आहे. मात्र, लहान-मोठ्या सहकारी व नागरी बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करून सहकार चळवळ संपविण्याचा सरकारचा डाव आहे.
सत्तेत असणाºया शिवसेनेने सरकारला जनहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्याऐवजी तेच रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली. पुरोगामी विचारांचे लोक, पत्रकार यांचे खून होत असताना तपास लागत नाही, यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी टोपे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली.
नागरी बँकांना कर्जमाफीतून वगळणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, गरजू व होतकरू माणसांना उभे करण्याचे काम समर्थ बँकेच्या माध्यमातून सुरू असून, ही परंपरा या पुढेही कायम राहील, असे टोपे यांनी सांगितले. या वेळी निसार देशमुख, रघुनाथ तौर, संजय कणके, संजय काळबांडे, बबलू चौधरी, संजय दाड, माऊली लाटे, बाबासाहेब राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, बँकेचे सभासद व शेतकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title:  Government's attempt to disrupt the cooperative sector- Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.