गोविंद शर्मा खेलो इंडियाच्या तांत्रिक अधिकारीपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:46 AM2019-01-15T00:46:47+5:302019-01-15T00:46:58+5:30
पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सअंतर्गत खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील संघटक गोविंद शर्मा यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. गोविंद शर्मा यांनी याआधी भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, तसेच ते महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे खजिनदार असून, जिल्हा खो-खो संघटना व जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे सचिवदेखील आहेत.
औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सअंतर्गत खो-खो स्पर्धेसाठी औरंगाबाद येथील संघटक गोविंद शर्मा यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. गोविंद शर्मा यांनी याआधी भारतीय खो-खो संघाचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, तसेच ते महाराष्ट्र राज्य खो-खो संघटनेचे खजिनदार असून, जिल्हा खो-खो संघटना व जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे सचिवदेखील आहेत. गोविंद शर्मा यांची तांत्रिक अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल औरंगाबाद जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष सचिन मुळे, उपाध्यक्ष डॉ. दीपक मसलेकर, रमेश भंडारी, बिजली देशमुख, युसूफ पठाण, गंगाधर मोदाळे, संजय मुंढे, गणेश बनकर, ज्ञानदेव मुळे, डी. डी. लांडगे, अजय तुपे, कैलास पटणे, दीपक सपकाळ, उमाकांत शिराळे आदींनी अभिनंदन केले आहे.