ग्रा.पं.स्तरावरील कामकाज ठप्प
By Admin | Published: July 11, 2014 12:04 AM2014-07-11T00:04:08+5:302014-07-11T01:03:13+5:30
सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.
सेनगाव : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी ग्रा. पं. स्तरावर स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामसेवक संपावर गेल्याने ग्रामीण भागात शेतकरी-ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. ग्रा. पं. स्तरावरील विविध प्रमाणपत्रे मिळत नसल्याने कार्यालयीन कामकाजही ठप्प झाले आहे.
रोजगार हमी योजनेसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाल कंत्राटी शिक्षकांप्रमाणे करावा, वीस ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करणे, आदर्श ग्रामसेवकांना दोन आगाऊ वेतनवाढ द्याव्यात, प्रवासभत्ता पगारासोबत तीन हजार करणे, ग्रामसेवकांवरील कामाचा ताण कमी करणे यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांच्या वतीने २ जुलैैपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवर कामे होत नसल्याने ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे. रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे. विद्यार्थ्यांना ग्रामसेवकांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.
शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. ग्रामसेवकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनामुळे सर्वांचीच गैरसोय होत असताना प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामसेवकांना काढण्यात आलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नसल्याने संघटनेचे अध्यक्ष, सचिव यांच्या पत्यावर नोटीसा पाठविण्याची कार्यवाही पंचायत समिती स्तरावर करण्यात आली आहे; परंतु त्याला संघटनेने प्रतिसाद दिला नसल्याने या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)
ग्रामसेवकांचा संप सुरूच
हिंगोली जिल्ह्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ जुलैैपासून ग्रामसेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू आहे.
मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत पातळीवरील कामे ठप्प झाली आहेत.
ग्रामस्थांची गैैरसोय झाली आहे.
रहिवासी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, नमुना नं.८, उत्पन्न प्रमाणपत्र यासह विविध प्रमाणपत्रे ग्रामसेवकांअभावी मिळत नसल्याने विद्यार्थी, ग्रामस्थांची अडचण झाली आहे.
शैक्षणिक कामकाजासाठी लागणारी प्रमाणपत्रे मिळत नसल्याने आठ दिवसांपासून त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत.
प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली नसल्याने वेठीस धरणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. जि.प.ने काढलेल्या नोटीसाही ग्रामसेवकांनी स्विकारल्या नाहीत.
या आंदोलनामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.