पदवीधर निवडणूक : औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ९ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 12:43 PM2020-12-01T12:43:47+5:302020-12-01T12:44:48+5:30

जिल्ह्यात एकूण १लाख ६ हजार ३७९ मतदार आहेत.

Graduate Election: 9% voting in first two hours in Aurangabad district | पदवीधर निवडणूक : औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ९ टक्के मतदान 

पदवीधर निवडणूक : औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ९ टक्के मतदान 

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात ७४९५९ पुरुष, ३१४१५ महिला मतदारजिल्ह्यात २०६ मतदान केंद्रे, तर शहरात ११७ मतदान केंद्रे

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ९.२७ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात एकूण ७४९५९ पुरुष, ३१४१५ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात २०६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक ११७ मतदान केंद्रे शहरात आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना केंद्रांपर्यंत आणणे उमेदवारांसाठी आव्हान आहे. जिल्ह्यात एकूण १८१ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. तर सकाळी पहिल्या दोन तासात  एकूण ९. २७ टक्के मतदान जिल्ह्यात झाले. जिल्ह्यात एकूण १लाख ६ हजार ३७९ मतदार आहेत. त्यात ५ मतदार तृतीयपंथी आहेत. सर्वाधिक ११७ मतदान केंद्रे औरंगाबाद तालुक्यात आहेत. सर्वात कमी प्रत्येकी ५ मतदान केंद्रे खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात आहेत. सिल्लोडमध्ये १५, कन्नड १४, फुलंब्री ६, पैठण १५, गंगापूर १४ आणि  वैजापूर १५ अशी एकूण २०६ मतदान केंद्रे आहेत. 

८० रुग्णवाहिका उपलब्ध 
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तालुकानिहाय आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी  उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी १०४ अधिकारी, २०६ कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ९९ अधिकारी आणि एकूण ८० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Web Title: Graduate Election: 9% voting in first two hours in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.