पदवीधरच्या प्रचारतोफा चिखलफेकीने थंडावल्या; उद्या होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 02:08 PM2020-11-30T14:08:44+5:302020-11-30T14:11:41+5:30

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.

The graduate's propaganda cannon cooled with mud | पदवीधरच्या प्रचारतोफा चिखलफेकीने थंडावल्या; उद्या होणार मतदान

पदवीधरच्या प्रचारतोफा चिखलफेकीने थंडावल्या; उद्या होणार मतदान

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी होणार मतदान३५ उमेदवार मैदानात

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. रणधुमाळीचा शेवटचा दिवस बहुतांश उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करीत गाजविला. 

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. शेवटच्या दिवशी जोरदार आरोप-प्रत्यारोप करीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ‘मीच’ निवडून येणार असल्याचा दावा केला. ३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रशासनाच्या ताब्यात सगळी यंत्रणा गेली असून, आचारसंहिता कक्षाची सर्व उमेदवारांवर करडी नजर राहणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. 

३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार 
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार असून, त्यात पुरुष पदवीधर मतदार २ लाख ८६ हजार २४९, तर महिला पदवीधर ८६ हजार ९०९ आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के महिला मतदारांचे प्रमाण आहे. विभागात एकूण ९३७ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आली आहे. सर्वाधिक १ लाख ६३ हजार ७९ पदवीधर मतदार संख्या औरंगाबाद जिल्ह्याची आहे. जालना २९ हजार ७६५, परभणी ३२ हजार ७१५, हिंगोलीत १६ हजार ७९४, नांदेड ४९ हजार २८५, बीड ६३ हजार ४३६, लातूर ४१ हजार १९०, उस्मानाबाद ३३ हजार ६३२  इतकी आहे. औरंगाबााद विभागात एकूण ८१३ मतदान केंद्रे आहेत. औरंगाबाद २०६, जालना ७४, परभणी ७८, हिंगोली ३९, नांदेड १२३, लातूर ८८, उस्मानाबाद ७४, तर बीडमध्ये १३१ मतदान केंद्रे आहेत. 

या पुराव्यांआधारे मतदान शक्य
आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र,  केंद्र-राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी उद्योगांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र लोकप्रतिनिधींचे अधिकृत ओळखपत्र, शिक्षकांना दिलेले ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे  पदवी-पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी मतदार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.

आद्याक्षरे लिहिलेले मतदान होईल बाद
मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत १ डिसेंबर रोजी पदवीधर मतदासंघ निवडणुकीसाठी मतदान होत असून मतदारांना काळजीपूर्वक पत्रिकेवर मत अंकात नोंदवावे लागेल. अंगठा लावलेले, सही, आद्याक्षरे किंवा कुठलेही चिन्ह, खूण करून केलेले मतदान बाद ठरेल. गेल्यावेळी १२ हजारांपेक्षा अधिक मते बाद ठरली होती. आयोगाच्या सूचनेनुसार मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर मतदारांना करावा लागेल. याशिवाय इतर कुठलेही पेन, पेन्सिल, बॉलपॉईंट पेनचा वापर करून केलेले मतदान अवैध ठरेल.

Web Title: The graduate's propaganda cannon cooled with mud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.