धान्य गोदाम, बंधारे, वाळूठेकेही तपासले

By Admin | Published: July 5, 2017 11:28 PM2017-07-05T23:28:47+5:302017-07-05T23:33:56+5:30

परभणी : जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या पथकाने बुधवारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेची धान्य गोदामे, रेशन दुकान, वाळू ठेक्यांसह बंधाऱ्यांचीही पाहणी

Grain warehouses, bundes, sandalaksakei also checked | धान्य गोदाम, बंधारे, वाळूठेकेही तपासले

धान्य गोदाम, बंधारे, वाळूठेकेही तपासले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या पथकाने बुधवारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेची धान्य गोदामे, रेशन दुकान, वाळू ठेक्यांसह बंधाऱ्यांचीही पाहणी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ अनियमितता असणाऱ्या ठिकणी जाब विचारत कामांचा आढावा घेतला़ त्यामुळे बुधवारचा संपूर्ण दिवस अधिकाऱ्यांसाठी ताणाताणीचा ठरला़
परभणी जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी विधान मंडळ अंदाज समितीचे पथक दोन दिवसांच्या मुक्कामी आले आहे़ आ़ उदय सामंत पथकप्रमुख असलेल्या या पथकात २५ आमदारांचा समावेश असला तरी ७ आमदार परभणी येथे पाहणीसाठी दाखल झाले आहेत़ तसेच मंत्रालयस्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा परभणीत पोहोचला आहे़ बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांची आढावा बैठक घेण्यात आली़ साधारणत: दोन तास ही बैठक चालली़ त्यानंतर या पथकाचे दोन गट तयार करण्यात आले़ समितीप्रमुख आ़ उदय सामंत, आ़ शशिकांत खेडेकर, आ़ सदा सरवणकर, आ़ मिलिंद माने आणि विधानमंडळाचे अव्वर सचिव विजय कोमटवार यांचे पथक दुपारी १२ च्या सुमारास गंगाखेड तालुक्यामध्ये पाहणीसाठी पोहोचले़ सुरुवातीला गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजमध्ये डिस्टलरी प्रकल्पाची पाहणी केली़ त्यानंतर गंगाखेड शहरातील शासकीय धान्य गोदाम, शहरालगत रेल्वे पुलाजवळ होत असलेला वाळूचा उपसा, शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम आदी कामांची पाहणी करण्यात आली़ त्यानंतर धारासूरमार्गे हे पथक मुळी येथे पोहोचले़ मुळीचा बंधारा, मुळी येथील रेशन दुकानाची पाहणीही पथकाने केली़ सायंकाळी ६़४५ वाजेच्या सुमारास आमदार आणि अधिकाऱ्यांचा ताफा सोनपेठ तालुक्यातील शिर्शी पुलाच्या पाहणीसाठी रवाना झाला होता़
दुसरे पथक सेलू, मानवत, पाथरी या तालुक्यांमध्ये पोहोचले़ या पथकामध्ये आ़ विरेंद्र जगताप, आ़ चरण वाघमारे, आ़ संजय कदम आणि बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश होता़ सेलू शहरातील धान्य गोदामाला पथकाने भेट दिली़ स्टॉक रजिस्टर, तांदूळ व गव्हाची प्रतवारी तपासली़ आमदार महोदयांनी विविध प्रश्न उपस्थित करताच गोदामपालाची फजिती झाली़ एफसीआयकडून धान्य खरेदी केल्यानंतर ते तपासण्यांसाठी ग्रेडरची नियुक्ती केली का? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ धान्य कट्ट्यांचे वजनही बरोबर आहे की नाही? याची शहानिशा पथकाने केली़ त्यानंतर हादगाव पावडे येथील स्टोन क्रेशर, पिंपरी खु़ येथील दूधना नदीतील वाळू घाट, निम्न दूधना प्रकल्पाच्या कालव्यांची तपासणी पथकाने केली़ कालव्याच्या कामासाठी मातीमिश्रीत वाळूचा वापर होत असल्याचे समितीला आढळले़

Web Title: Grain warehouses, bundes, sandalaksakei also checked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.