ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By Admin | Published: April 1, 2016 12:54 AM2016-04-01T00:54:53+5:302016-04-01T00:56:18+5:30
नांदेड : शासनाकडून आलेले १०० टक्के अनुदान गटविकास अधिकारी ५० टक्केच वाटप करीत असल्याबद्दल संतापलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले़
नांदेड : शासनाकडून आलेले १०० टक्के अनुदान गटविकास अधिकारी ५० टक्केच वाटप करीत असल्याबद्दल संतापलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गुरूवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन केले़ यावेळी कर्मचाऱ्यांनी काही वेळ रस्ता रोको केल्याने वाहने खोळंबली होती़
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शासनाने पाठविलेले १०० टक्के अनुदान गट विकास अधिकारी जाणिवपूर्वक ५० टक्केच वाटप करीत आहेत़ उर्वरित ५० टक्के रक्कम पंचायत समितीत जमा आहे़ हदगाव, हिमायतनगर, भोकर, नांदेड, अर्धापूर, मुदखेड, मुखेड, किनवट तालुक्यात ५० टक्केच अनुदान वाटप केले आहे़ शासन निर्णयानुसार १०० टक्के अनुदान वाटप करण्यात यावे, पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे अपघात विमा काढावा, एप्रिल २००७ पासून राहणीमान भत्ता द्यावा आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत़