ग्रा.पं.निवडणुकीत १०४५ उमेदवारांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:15 AM2017-09-22T00:15:05+5:302017-09-22T00:15:05+5:30

जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुरुवारी सरपंच पदासाठी १६६ आणि सदस्यपदासाठी ८७९ असे १ हजार ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

GrameenPrime Application for 1045 candidates in the election | ग्रा.पं.निवडणुकीत १०४५ उमेदवारांचे अर्ज

ग्रा.पं.निवडणुकीत १०४५ उमेदवारांचे अर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गुरुवारी सरपंच पदासाठी १६६ आणि सदस्यपदासाठी ८७९ असे १ हजार ४५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
ग्रामपंचात निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी २२ सप्टेंबर ही शेवटची तारीख असल्याने इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे. परभणी येथील तहसील कार्यालयात सकाळपासून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. दिवसभरात परभणी तालुक्यामध्ये सरपंचपदासाठी ४८ तर सदस्यपदासाठी २९० अर्ज दाखल झाले. पालम तालुक्यात सरपंचपदासाठी ९, सदस्यपदासाठी ८३, गंगाखेड तालुक्यात सरपंचपदासाठी १६ तर सदस्यांसाठी ६२, सोनपेठ तालुक्यात सरपंचपदासाठी ७, सदस्यांसाठी ३३, पाथरी तालुक्यात सरपंच पदासाठी १७ तर सदस्यांसाठी ४७, मानवत तालुक्यात सरपंचपदासाठी २२ आणि सदस्यांसाठी १२७, पूर्णा तालुक्यात सरपंचपदासाठी ३०, सदस्यपदासाठी १४४ तर सेलू तालुक्यामध्ये सरपंचपदासाठी १७ आणि सदस्य पदासाठी ९३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

Web Title: GrameenPrime Application for 1045 candidates in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.