ग्रामसेवक बडे चौकशीच्या फेऱ्यात

By Admin | Published: April 23, 2016 11:29 PM2016-04-23T23:29:42+5:302016-04-23T23:57:36+5:30

बीड : तालुक्यातील चऱ्हाटा येथील ग्रामसेवक व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे हे मग्रारोहयोतील गैरव्यवहारामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

Gramsevak in a bigger inquiry round | ग्रामसेवक बडे चौकशीच्या फेऱ्यात

ग्रामसेवक बडे चौकशीच्या फेऱ्यात

googlenewsNext


बीड : तालुक्यातील चऱ्हाटा येथील ग्रामसेवक व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण बडे हे मग्रारोहयोतील गैरव्यवहारामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
लेखणीबंदच्या काळात ६१ मजूर मस्टरला दाखवून परस्पर मजुरी उचलल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली होती. त्यानंतर राज्य माहिती आयोगानेही बडे यांना नोटीस बजावली. दरम्यान, डॉ. ढवळे यांनी लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बडे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे माहिती आयोगापाठोपाठ जिल्हा प्रशासनाच्या चौकशीचा ससेमिरा बडे यांच्यापाठीमागे लागला आहे. माहिती आयोगाने एक महिन्याची मुदत दिली असून, कारवाईची तंबी देखील दिली आहे. त्यामुळे बडे यांच्यासमोर अडचणी वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Gramsevak in a bigger inquiry round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.