मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

By संतोष हिरेमठ | Published: December 30, 2023 01:32 PM2023-12-30T13:32:33+5:302023-12-30T13:34:39+5:30

१ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचणार

Grand inauguration of Marathwada's first 'Vande Bharat Express'; But in the new year itself in the service of common people | मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

छत्रपती संभाजीनगर : जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे आज दुपारी जालना येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एक्सप्रेसमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केला. ही एक्सप्रेस सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. मात्र, नववर्षातच ती सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होणार असून, १ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचेल, तर २ जानेवारीपासून जालन्याहून मुंबईच्या दिशेने नियमित धावणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची नियमित सेवेची सुरुवात १ जानेवारीपासून होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, रेल्वेचे तिकीट दर अजून जाहीर झालेले नाहीत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कुठलीही बुकिंग सुरू झाली नव्हती. शनिवारी दुपारी तिकीट दर समजण्याची शक्यता आहे.

...असे आहे वेळापत्रक
२०७०६ - मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि.१ जानेवारीपासून रोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि नमूद वेळापत्रकानुसार त्याचदिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.

स्थानके- आगमन / निर्गमन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई /१३.१० वाजता
दादर - १३.१७ वाजता / १३.१९ वाजता
ठाणे - १३.४० वाजता/१३.४२ वाजता
कल्याण जंक्शन - १४.०४ वाजता / १४.०६ वाजता
नाशिक रोड - १६.२८ वाजता/१६.३० वाजता
मनमाड जंक्शन - १७.३० वाजता / १७.३२ वाजता
छत्रपती संभाजीनगर- १९.०८ वाजता / १९.१० वाजता
जालना - ---/२०.३० वाजता

२०७०५ जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस :
२ जानेवारीपासून रोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि नमूद वेळापत्रकानुसार त्याचदिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.

स्थानके - आगमन/निर्गमन
जालना ---/०५.०५ वाजता
छत्रपती संभाजीनगर - ०५.४८ वाजता/०५.५० वाजता
मनमाड जंक्शन - ०७.४० वाजता/०७.४२ तास
नाशिक रोड - ०८.३८ वाजता/०८.४० वाजता
कल्याण जंक्शन - १०.५५ वाजता/१०.५७ वाजता
ठाणे - ११.१० वाजता/११.१२ वाजता
दादर - ११.३२ वाजता / ११.३४ वाजता
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - ११.५५ वाजता/

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर

Web Title: Grand inauguration of Marathwada's first 'Vande Bharat Express'; But in the new year itself in the service of common people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.