अवघ्या चार वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:01 PM2022-03-08T19:01:27+5:302022-03-08T19:03:51+5:30

सत्र न्यायालयाने पोक्सो आणि भादंवि कायद्यांतर्गत ठोठावली शिक्षा

Grandfather sentenced to 20 years in prison for sexually abusing four-year-old grand daughter | अवघ्या चार वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे कारावास

अवघ्या चार वर्षाच्या नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम आजोबाला २० वर्षे कारावास

googlenewsNext

औरंगाबाद : अवघ्या चार वर्षाच्या नातीसोबत अश्लील चाळे करून, तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधम ५६ वर्षीय चुलत आजोबाला सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सोमवारी २० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांखाली १५ हजार रुपये दंड ठोठावला.

पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीला दारूचे व्यसन असल्यामुळे ती मुलीसह आईकडे माहेरी राहत होती. ती मोलमजुरी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. २८ ऑगस्ट २०१६ रोजी सायंकाळी ती कामावरून घरी आली. त्यावेळी महिलेच्या आईने सांगितले की, सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिलेचा चुलत मामा घरी आला होता. महिलेची आई स्वयंपाकासाठी आत गेली होती. मात्र आईला शंका आल्याने तिने घरामध्ये पाहिले असता तेथे कोणीच दिसले नाही. आईने आतील खोलीमध्ये पाहिले तेव्हा आरोपी पीडितेचे लैंगिक शोषण करताना दिसला. महिलेच्या आईने जाब विचारताच तो पळून गेला. याबाबत एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुनावणी आणि शिक्षा
खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात पीडितेची आजी आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून पोक्सोच्या कलम ६ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड आणि भादंवि कलम ३७६ (२) अन्वये १० वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. जमादार शेख रज्जाक यांनी पैरवी म्हणून सहकार्य केले.
 

Web Title: Grandfather sentenced to 20 years in prison for sexually abusing four-year-old grand daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.