शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान; आकडेवारी प्रशासनाच्या दप्तरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:53 PM2019-02-25T23:53:27+5:302019-02-25T23:54:13+5:30

औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला ...

Grant of Farmer Honor Plan; Statistics at the administration's desk | शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान; आकडेवारी प्रशासनाच्या दप्तरात

शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान; आकडेवारी प्रशासनाच्या दप्तरात

googlenewsNext
ठळक मुद्देमाहितीची जमवाजमव: तांत्रिक अडचणींमुळे उशीर होत असल्याचा दावा


औरंगाबाद : केंद्र शासनाने शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता टाकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला याबाबतची माहिती अजून तरी प्रशासनाच्या दप्तरीच अडकली आहे. महसूल, कृषी तसेच बँकेतील अधिकाऱ्यांच्या ताळमेळात सदरील योजनेची माहिती सोमवारपर्यंत समोर आलेली नव्हती.
विभागात आजवर १४ लाख ९६ हजार पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती योजनेच्या अनुषंगाने आॅनलाईन अपलोड केली आहे. त्यातील किती शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे मिळाले, याबाबत कोणतीही माहिती महसूल प्रशासनाला नाही. तसेच गाव, तालुका, जिल्हास्तरावर बँकांमध्ये किती शेतकºयांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले याबाबत मात्र कोणतीही माहिती बँकांकडे उपलब्ध नाही.
ज्या शेतकºयांचे आधार कार्डवर जे नाव आहे, तेच नाव बँक खात्यावर असावे. यासह इतर अचूक माहिती गावपातळीवरून भरून घेण्यात येत आहे. त्यातील माहिती चुकीची भरली किंवा आधार कार्ड व बँक खात्यावरील नावांमध्ये फरक आढळला, तर त्या शेतकºयांना निधी मिळण्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे संबंधित माहिती अपलोड करण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१७ लाख कुटुंबे पात्र
२५ फेब्रुवारीपर्यंत विभागातील १७ लाख ३९ हजार ४७४ कुटुंबे पात्र ठरली आहेत. यातील काही कुटुंबांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. योजनेनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांना या योजनेतून प्रतिकुटुंबास दरवर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येणार आहेत. अल्पभूधारकांना ही योजना लागू राहणार आहे. ज्या शेतकºयांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्या शेतकरी कुटुंबांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Grant of Farmer Honor Plan; Statistics at the administration's desk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.