अल्पसंख्याक शाळांसाठी अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:13 AM2017-09-08T00:13:57+5:302017-09-08T00:13:57+5:30
जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे.
अल्पसंख्याक शाळेच्या पायाभूत सोयी-सुविधांसाठी असलेल्या अनुदान योजनेत अर्ज करण्यासाठी १८ सप्टेंबरची मुदत आहे. जिल्ह्यातील धार्मिक, अल्पसंख्याक, विद्यार्थीबहुल शासनमान्य शाळा महाविद्यालयामध्ये अल्पसंख्याक समाजाचे ७० टक्के विद्यार्थी शिकणे आवश्यक आहे.
पायाभूत सुविधा अनुदान योजनेअंतर्गत २ लाख पर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण व डागडुजी, ग्रंथालय अद्यावतीकरण, संगणक कक्ष उभारणे, फर्निचर, इनव्हर्टर, अध्यायनाची साधने आदींसाठी निधी दिला जाणार आहे, असे संबंधितांनी कळविले आहे.