रंगमंदिर सुरू करण्याचा ठराव मंजूर

By Admin | Published: December 11, 2014 12:29 AM2014-12-11T00:29:08+5:302014-12-11T00:31:11+5:30

परभणी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करून ते सुरू करण्याचा ठराव बुधवारी स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला़

Granted a proposal to start the theater | रंगमंदिर सुरू करण्याचा ठराव मंजूर

रंगमंदिर सुरू करण्याचा ठराव मंजूर

googlenewsNext

परभणी : शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या नटराज रंगमंदिराची दुरुस्ती करून ते सुरू करण्याचा ठराव बुधवारी स्थायी समितीच्या सर्वसाधारण सभेत एकमताने पारित करण्यात आला़ ‘लोकमत’ ने दहा दिवसांपासून लावून धरलेल्या हा प्रश्न तडीस जाण्याची आशा निर्माण झाली आहे़
बी़ रघुनाथ सभागृहात स्थायी समितीची बैठक सभापती विजय जामकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ बैठकीस उपायुक्त दीपक पुजारी, रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती़ बैठकीत विषय क्रमांक २९ मध्ये शहरातील नटराज रंगमंदिराचा प्रश्न उपस्थित करण्यात आला़ रंगमंदिराची आधुनिक पद्धतीने दुरुस्ती करून बीओटी तत्वावर ते चालविण्याबाबत चर्चा करण्यात आली़ दुरुस्तीसाठी ३ कोटी ५४ लाख एवढा खर्च अपेक्षित असल्याचे शहर अभियंता रमेश वाघमारे यांनी सांगितले़ रंग मंदिरातील एसी बंद अवस्थेत असून, खुर्च्या तुटल्या आहेत़ रंगमंदिर पूर्वपदावर आणण्यासाठी अपेक्षित रक्कम कशी उभी करावी, यावर चर्चा करण्यात आली़ स्थायी समितीचे सभापती विजय जामकर यांनी सांगली बँकेकडे कर्ज मागणी केलेली आहे़, अशीही माहिती देण्यात आली़ शासनाच्या निधीतून किंवा बीओटी तत्त्वावर रंगमंदिराचे काम लवकरात लवकर सुरू करावे, असा शिवाजी भरोसे, मेहराज कुरेशी, व्यंकट डहाळे यांनी आग्रह धरला़ शहरातील स्थानिक कलावंतांसाठी रंगमंदिर दुरुस्त करून देणे ही मनपाची जबाबदारी असल्याचे उदय देशमुख यांनी सांगितले़
रंगमंदिराच्या दुरुस्तीबाबत स्थानिक कलावंतांनी प्रश्न लावून धरला आहे़ शनिवारी आ़ राहुल पाटील हे रंगमंदिराच्या अवस्थेची पाहणी करणार आहेत़ त्यानंतर स्थानिक कलावंतांचे शिष्टमंडळ पाटील यांच्या समवेत नागपूरला जाणार असून, मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे कलावंत संघर्ष समितीने सांगितले आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Granted a proposal to start the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.