गवळी धानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा

By Admin | Published: September 30, 2014 01:08 AM2014-09-30T01:08:11+5:302014-09-30T01:30:21+5:30

लासूर स्टेशन : गवळी धानोरा येथील राजुळे व मोरे शेतवस्तीवर रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी सात जणांना कोयता-कुऱ्हाडीने मारहाण करून

Grassland farming | गवळी धानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा

गवळी धानोऱ्यात शेतवस्तीवर दरोडा

googlenewsNext


लासूर स्टेशन : गवळी धानोरा येथील राजुळे व मोरे शेतवस्तीवर रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांनी सात जणांना कोयता-कुऱ्हाडीने मारहाण करून पाऊणलाखांचा ऐवज नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरे वस्तीवर दरोडेखोरांनी पहिला हल्ला चढविला. त्यानंतर त्यांनी राजुळे वस्तीवर मारहाण करून लूटमार केली. या हल्ल्यात भिका लक्ष्मण राजुळे, कासाबाई आसाराम मोरे, लीलाबाई भिका राजुळे, संतोष भिका राजुळे, सुनीता गिरजाराम मांडवगड, मुक्ताबाई भगवान मोरे, भगवान किसन मोरे यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण करून ७२,७५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी भिका लक्ष्मण राजुळे यांच्या फिर्यादीवरून शिल्लेगाव पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभराच्या अंतराने पडलेला हा दुसरा दरोडा आहे. १९ आॅगस्ट रोजी घोडेगाव येथे दरोडा पडला होता. त्या दरोड्यातही चारच दरोडेखोरांचा सहभाग होता. या दरोड्यातही चारच दरोडेखोर होते, त्यामुळे या दरोड्यांमागे एकच टोळी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Grassland farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.