राशींच्या गमतीजमती आणि हास्याचा खळखळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 11:31 PM2016-06-14T23:31:11+5:302016-06-14T23:58:23+5:30
औरंगाबाद : मेष राशीच्या व्यक्ती कमालीच्या तापट असतात. त्यांना जर वृषभ राशीची पत्नी मिळाली तर त्यांच्या आयुष्यात कोणत्या गमतीजमती होतात, तसेच प्रत्येक राशीची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत,
औरंगाबाद : मेष राशीच्या व्यक्ती कमालीच्या तापट असतात. त्यांना जर वृषभ राशीची पत्नी मिळाली तर त्यांच्या आयुष्यात कोणत्या गमतीजमती होतात, तसेच प्रत्येक राशीची कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत, त्यांच्या स्वभावामुळे कसे विनोदी प्रसंग पुढे उभे ठाकतात याची अनेक उदाहरणे देत ज्योतिषाचार्य विवेक म्हेत्रे यांनी ‘राशीकवच’ या कार्यक्रमातून सखींना पोट धरून हसायला भाग पाडले.
प्रसंग होता कलर्स वाहिनी आणि लोकमत सखीमंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धमाल विनोदी कार्यक्रम ‘राशीकवच’चा. या कार्यक्रमातून प्रसिद्धी ज्योतिषी विवेक म्हेत्रे यांनी राशींबद्दल माहिती देऊन प्रत्येक राशीबद्दल उपस्थितांना जागरूक केले. संत एकनाथ रंगमंदिर येथे सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. विवेक म्हेत्रे व रवि मसालेचे अजित जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याभोवती आपले आयुष्य फिरत असते. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने तिन्ही काळांचा विचार करून पावले टाकत असतो. काल केलेल्या चुका आज करायच्या नाहीत आणि पुढे पण होऊ द्यायच्या नाहीत असे ठरवणारा प्रत्येक जण तिन्ही काळांचा विचार करीत असतो. पण हा विचार करीत असताना नेमका राशींचा प्रभाव त्याच्या जीवनावर कसा आणि केव्हा होतो, मनुष्याचा स्वभाव, त्याच्या आवडीनिवडी, त्याचा व्यवसाय, प्रगती, नोकरी, यश या सर्व गोष्टींवर त्याच्या कर्तृत्वाबरोबर त्याच्या नशिबाचा आणि राशींचा कसा प्रभाव पडतो, हेच नेमके या कार्यक्रमातून सांगण्यात आले. सखीमंच सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
कलर्स चॅनल व लोकमत सखीमंच प्रस्तुत पुन्हा एकदा नवीन संकल्पना नवीन विषय घेऊन गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या भेटीला आले आहेत. वेगळा विषय, वेगळी कथा, वेगळा बाज घेऊन हा कार्यक्रम प्रस्तुत झाला.
वेगवेगळे विषय हाताळून प्रेक्षकांना नाविन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न नेहमीच ‘कलर्स’ चॅनलतर्फे करण्यात येतो. ‘कवच’ या कलर्स चॅनलच्या नवीन धारावाहिक मधून परिधी आणि राजबीर या जोडप्याची कथा सांगण्यात आली. एक वाईट शक्ती मंजुलिका राजबीरच्या प्रेमात पडते आणि त्याला जिंकण्यासाठी पारिधीला संमोहित करते. परिधी मंजुलिकाच्या वाईट जादुतून बाहेर निघू शकेल का? परिधीचे प्रेम बनू शकेल का तिचे कवच काळ्या शक्तींपासून वाचण्यासाठी? जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका कलर्सची नवीन धारावाहिक ‘कवच’ दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता.
कलर्स वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मालिका ‘कवच काली शक्तीयोंसे’ यातील एक प्रसंग शीतल देठे व नीलेश सातपुते यांनी सादर केला. या मालिकेतील मुख्य कलाकारांची वेशभूषा करून सादर झालेला हा प्रसंग सखींना ही मालिका नियमितपणे पाहण्याची नवी ओढ लावून गेला.