टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 07:11 PM2021-02-16T19:11:30+5:302021-02-16T19:15:26+5:30

Greta Thunberg toolkit case टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे.

Greta Thunberg toolkit case : Transit bail granted to Shantanu Muluk in toolkit case | टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देबेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू मुळूक याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट घेतले होते.

औरंगाबाद : ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बीड येथील शंतनू शिवलाल मुळूक याला औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी १० दिवसाचा अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मंजूर केला. बेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू मुळूक याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट घेतले होते .

टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेची कारवाई टाळण्यासाठी मुळूक याने औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. खंडपीठात सुनावणीदरम्यान युक्तिवाद करण्यात आला की, आपले  स्वातंत्र्य अबाधित राखणे आपला हक्क आहे. सत्य मiडण्याकरिता आपल्याला न्यायालयापुढे हजर राहायचे आहे. हे प्रकरण दिल्ली न्यायालयापुढे सुरू असल्याने त्याची गुणवत्ता निश्चित करण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. शासनातर्फे मुळूकला अटकपूर्व ट्राझिट जामीन देण्यास विरोध करण्यात आला. सुनावणीअंती खंडपीठाने मूळ प्रकरणाच्या गुणवतेवर कोणतेही भाष्य न करतावरील प्रमाणे आदेश दिला. याप्रकरणी शासनाच्या वतीने अॅड. एस. वाय. महाजन यांनी काम पाहिले.

 

टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट जामिनावर हायकोर्ट उद्या देणार निर्णय

 

दिल्ली पोलीस दोन दिवस होते बीडमध्ये 
शंतनूचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, त्यांना शंतनू सापडला नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सूत्रांकडून समजते. बीडमधील संशयित शंतनूचे जागतिक पातळीवर पर्यावरणासंदर्भात काम आहे. या तरुणासह इतर चार अशा पाच लोकांचा ग्रुप असल्याचे सांगण्यात येते. याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शविला होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

Web Title: Greta Thunberg toolkit case : Transit bail granted to Shantanu Muluk in toolkit case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.