गेवराईत रेशन दुकानदाराच्या घराची झाडाझडती
By Admin | Published: March 27, 2017 11:42 PM2017-03-27T23:42:50+5:302017-03-27T23:46:04+5:30
गेवराई : शहरातील गजानननगर भागात राहणारे रेशन दुकानदार मोहन बन्सीलाल भुतडा यांच्या घराची सोमवारी सहायक निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली.
गेवराई : शहरातील गजानननगर भागात राहणारे रेशन दुकानदार मोहन बन्सीलाल भुतडा यांच्या घराची सोमवारी सहायक निबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली. भुतडा यांच्याबद्दल अवैध सावकारकीची तक्रार होती. त्यानुषंगाने ही तपासणी करण्यात आली.
भुतडा हे जातेगावचे रहिवासी असून, गजाननगर भागात वास्तव्यास आहेत. गावातीलच बालाजी पवार, भगवान चव्हाण, बाळू पवार यांनी भुतडा हे अवैध सावकारकी करत असल्याची तक्रार येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे डिसेंबर २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर पुन्हा दोन तक्रार अर्ज दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास सहाय्यक निबंधक सावकार (सावकारी) सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक केशव घुले यांच्या आदेशानुसार सहकारी अधिकारी एस. बी. जाधव, सहायक सहकारी अधिकारी एम. एल. देशपांडे, ए. एम. पाठक यांनी पोलीस बंदोबस्तात भुतडा यांच्या घराची झाडाझडती घेतली. यावेळी भुतडा घरात नव्हते. चौकशी गोपनीय असल्यामुळे त्याचा तपशील सांगण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
याबाबत भुतडा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.