गटबाजीचेही दणाणले ढोल

By Admin | Published: July 11, 2017 12:12 AM2017-07-11T00:12:31+5:302017-07-11T00:13:02+5:30

बीड :सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसह मोंढा शाखेसमोर ‘ढोल बजाओ’ आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

Grindstone drum | गटबाजीचेही दणाणले ढोल

गटबाजीचेही दणाणले ढोल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भाजप सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून, शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली आहे. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोमवारी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेसह मोंढा शाखेसमोर ‘ढोल बजाओ’ आणि थाळीनाद आंदोलन करण्यात आले. कर्जमाफीसाठी झालेल्या आंदोलनात गटबाजीचे ढोलही निनादले.
जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या उपस्थितीत ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात आले. सकाळपासूनच पदाधिकारी, शेतकरी आणि शिवसैनिक बँकेसमोर दाखल झाले. सरकारविरोधात फलक झळकावत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कर्जमाफीत पारदर्शकता आणावी, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेच्या शाखेत प्रसिद्ध करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जगताप, पिंगळे, पंडित यांनी शिवसेनेची भूमिका मांडत सरकारवर आरोप केले. या आंदोलनात जि.प.चे सभापती युधाजित पंडित, जिल्हा सचिव सुनील अनभुले, युवासेनेचे जिल्हाधिकारी सुशील पिंगळे, गणेश घुंबार्डे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, रत्नाकर शिंदे, परमेश्वर सातपुते, जयसिंग चुंगडे, किशोर जगताप, नगरसेवक लक्ष्मण विटकर, संजय उडाण, अजय दाभाडे, बाळासाहेब अंबुरे, शिवराज बांगर सह शिवसैनिकांनी भाग घेतला.
मोंढा डीसीसी शाखा
दरम्यान, बीड जिल्हा बँकेच्या मोंढा शाखेसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी थाळीनाद, ‘ढोल बजाओ’ आंदोलन केले. यावेळी सरकारच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, माजी आ.सुनील धांडे, चंद्रकांत नवले, विलास महाराज शिंदे, नारायण काशीद, संजय महाद्वार, शहरप्रमुख सुदर्शन धांडे, नवनाथ प्रभाळे, बाळासाहेब जटाळ, नंदू येवले, अशोक गडदे, वैजनाथ ढोरमारे, राजू शिंदे, आसाराम आमटे, रवींद्र गलधरसह शिवसैनिक व शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Grindstone drum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.