काळ्या बाजारात जाणारा गहू पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:53 AM2017-09-11T00:53:01+5:302017-09-11T00:53:01+5:30
शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या परभणी- औंढा राज्य रस्त्यावर शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने वाहन रविवारी रात्री १० च्या सुमारास ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या परभणी- औंढा राज्य रस्त्यावर शासनाच्या स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विक्रीस घेऊन जात असताना पोलीस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने वाहन रविवारी रात्री १० च्या सुमारास ताब्यात घेतले.
सदर वाहनाची झाडाझडती घेतली असता वाहनचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलीस निरीक्षक दराडे यांच्यासमवेत असलेले फौजदार साईनाथ अनमोड यांनी वाहनाची पुन्हा झडती घेतली असता त्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातील गहू व तांदूळ असल्याचे आढळून आले. मालाची पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये एकूण १८ ते १९ कट्टे आढळले. त्यामुळे वाहन जप्त करुन औंढा पोलीस ठाण्यात लावण्यात आले. चालकाची बारकाईने चौकशी केली जात होती. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. अजून काही माल आहे का? याचा परिसरात पोलीस शोध घेत होते. अधून मधून चोरीच्या घटना घडत असल्याने अनेक लाभार्थीही अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे संबंधित विभाच्या अधिकाºयांनी लक्ष देणे गरजेचे आहे.