मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:31 PM2018-12-24T16:31:06+5:302018-12-24T16:33:44+5:30

अनेकदा शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात.

The groom needs farm land but not a farmer as husband. | मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई !

googlenewsNext

उंडणगाव (औरंगाबाद ) :  लाखो रुपये किंमतीच्या जमिनीचा मालक उच्चशिक्षित असला तरीही लग्न गाठ बांधायला कुणी हो म्हणत नाही. लग्नासाठी मुलगी वाले नोकरी वाल्यांचा शोधात आहे. शेतकरी नवरदेवांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी लग्नासाठी प्रस्ताव पाठवले. पण लग्नगाठ बांधायला कुणी तयार नाही. शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको गं बाई... 

शेतकरी नवरदेव असल्याने मुली किंवा मुलीच्या घरची मंडळी थेट नकार कळवतात. तसेच गरीबातील गरीब ही नोकरी वाला नवर देव मिळावा हाच हटहास धरून बसतात. तुळशी विवाह सोहळा झाल्यावर लग्न गाठी बांधण्याची जुळवा जुळव सुरू होऊन लग्न सराईला सुरूवात होते. सनई चौघड्याचे सुर वाजण्याला सुरूवात होते. सर्वेत्र मंगलमय आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

काही जणांचे जमले तर ते साखरपुड्यातच उरकून टाकण्याला मागे पुढे पहात नाही. लग्न गाठी जमवितांना सध्या मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत आहे. कारण प्रत्येकांनी स्थळ हे नोकरी चेच पाहिजे. मग देणे कितीही मोजावे लागले तरी ते मागे न हटता लग्न जमविण्याचा प्रयत्न करतातच. शेतकरी मुलांना पसंती कमी दाखवू लागले आहेत. सगळ्यांनी शेतकरी असल्याने नकार देतात. शेतकरी नवरा नको, सरकारी नोकरी आणि तोही एखाद्या विभागात शिपाई असला तरी चालेल असे अनेक जण म्हणतात. 

...मग शेती कोण करेल 
शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटं आले तरी शेतकरी महिन्याला हजारो रुपये कमवितात. पण लग्न करण्यासाठी हे उत्पन्न ही पुरेसे असते. शेतकरी असल्याने अनेक मुलींनी नकार देऊन टाकतात. जे तरुण शेती करतात. त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशीच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. तरुण शेतकऱ्यांच्या पिढीला लग्नाशिवाय काही वर्षे तसेच राहावे लागते असलेल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे तरुणांनी शेती करणं सोडून दिले तर आता आलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती कोण करेल, हा आकडा भविष्यात आणखी वाढेल. अशी भीती काही जाणकार शेतकऱ्यांना वाटत आहे. 

Web Title: The groom needs farm land but not a farmer as husband.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.