भूजल सर्वेक्षण कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 10:38 PM2019-04-05T22:38:56+5:302019-04-05T22:39:10+5:30

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Groundwater survey officers abducted | भूजल सर्वेक्षण कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ

भूजल सर्वेक्षण कार्यालयातील अधिकाऱ्यांना शिवीगाळ

googlenewsNext

औरंगाबाद : ज्योतीनगर येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयात अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.


कुंदन विष्णू गवळी (४२, रा. मुकुंदवाडी) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे. उस्मानपुरा परिसरातील ज्योतीनगर येथे शासनाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे कार्यालय आहे. ३ एप्रिल रोजी डॉ.पंचमलाल लक्ष्मण साळवे हे कार्यालयीन कामकाज करीत होते. त्यावेळी कुंदन गवळी हे तेथे आले. तुम्ही त्यांच्यासह अन्य महिला आणि पुरुषांना नोकरीवर का घेत नाही, असे म्हणून त्यांनी साळवे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी साळवे हे त्यांना समजावून सांगत असताना त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार डॉ. साळवे यांनी उस्मानपुरा पोलिसांना दिली.

 

Web Title: Groundwater survey officers abducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.