वीज कंपनीच्या अभियंत्यास घेराव
By Admin | Published: June 16, 2014 12:15 AM2014-06-16T00:15:35+5:302014-06-16T01:19:11+5:30
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज गुल आहे. शेतीचे रोहित्र तर दुरूस्तच केले जाईनात.
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज गुल आहे. शेतीचे रोहित्र तर दुरूस्तच केले जाईनात. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी सहायक अभियंता व्ही.एस. लहाने यांना रविवारी दुपारी २ वाजता घेराव घातला.
या परिसरातील १२ ते १३ गावांमध्ये रोहित्र जळालेले आहेत. आष्टीत गेल्या १५ दिवसांपासून रोहित्र जळालेले आहे. उपलब्ध असलेले पाणीही पिकाला देता येत नाही. जोमदार वाढलेलली पिके करपत आहेत. वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांना वारंवार विनंती करूनही काहीच उपयोग होईना. आष्टी, वाहेगाव, पांडेपोखरी, होतवाडी, आसनगाव, कोकाटे हादगाव आदी गावात एकच फिडर आहे. कोकाटे हादगाव, धामनगाव ही गावे लिखी केंद्राला जोडण्यात आली आहेत. पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने वीज कार्यालयात जाऊन लहाने यांना घेराव घातला. शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहूल लोणीकर, माणिकराव वाघमारे, कृष्णा कुरधने, सिद्धेश्वर सोळंके, अशोक चिखलीकर, चौधरी, कोरडे आदींचा सहभाग होता.