गटसचिव संपावर गेल्याने शेतकऱ्यांची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:02 AM2021-06-30T04:02:07+5:302021-06-30T04:02:07+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गटसचिव यांचा नियमित पगार नसल्यामुळे ११ जूनपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले ...
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गटसचिव यांचा नियमित पगार नसल्यामुळे ११ जूनपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधी खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेतून पीककर्ज घेण्यासाठी सोसायटीची बेबाकी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. परंतु सचिव संपावर असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. याव्यतिरिक्त सोसायटीची कर्ज वाटप व कर्ज वसुली आदी कामे खोळंबली आहेत. शिऊरसह सफियाबादवाडी, हाजीपूरवाडी, रघुनाथपूरवाडी, पेडेफळ, अलापूरवाडी, निमगाव, सावखेडा, बळेगाव, पिंपळगाव गावातील शेतकऱ्यांना शेतीकामे सोडून बेबाकीसाठी सोसायटीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
--
यासाठी गटसचिव संपावर...
गटसचिवांचे नियमित पगार करण्यात यावेत, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ७९ (१) अंमलबजावणी बँकेने करावी व एक टक्का शासकीय अनुदानाचे प्रलंबित प्रस्ताव ताबडतोब मंजूर करण्यात यावेत.