‘जीएसटी’ कायदेविषयक मार्गदर्शन

By Admin | Published: July 17, 2017 12:16 AM2017-07-17T00:16:20+5:302017-07-17T00:34:20+5:30

हिंगोली :मुंबई येथील सीए रोहित जैन यांनी कार्यशाळेत जीएसटी विषयी सखोल मार्गदर्शन केले.

'GST' legal guidance | ‘जीएसटी’ कायदेविषयक मार्गदर्शन

‘जीएसटी’ कायदेविषयक मार्गदर्शन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जीएसटी कर कायद्याविषयी सर्वांना माहिती व्हावी यासाठी महावीर भवन येथे १६ जुलै रोजी जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्हा कर सल्लागार संघटना तसेच महावीर भवन यांच्या संयुक्त विद्यमाने जीएसटी कायदेविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील सीए रोहित जैन यांनी कार्यशाळेत जीएसटी विषयी सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अ‍ॅड. सतीश देशमुख, निश्चल यंबल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. १ जुलै २०१७ पासून शासनाने ‘जीएसटी’ कर कायदा अस्तित्वात आणला आहे. परंतु या कायद्याविषयी संभ्रम आहे. शिवाय याबाबत अनेकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे नवीन कर कायद्याची माहिती व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार, सीए तसेच जनतेला व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कायद्यातील तरतुदी तसेच व्यापाऱ्यांनी घ्यावयाची दक्षता या संदर्भात सिए रोहित जैन यांनी जीएसटी कायदा काय आहे, व्यापारी, उद्योजक तसेच छोटे व्यावसायिकांनी कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती सांगितली. जीएसटी कर कायद्याच्या माध्यमातून व्यवसायाला नवी दिशा द्या असे त्यांनी यावेळी आवाहन केले. मोकळी जागा, यामध्ये प्लॉट तसेच बॅ्रन्डेड नसलेल्या वस्तूवर जीएसटी कर लागू नाही, याचे स्पष्टीकर त्यांनी यावेळी दिले. पेट्रोल, डीजेल, नॅचरल गॅस यावर येत्या दोन वर्षात जीएसटी कर लागू होणार असल्याचे जैन यांनी यावेळी सांगितले. सदर कायदेविषयक कार्यशाळेस मोठ्या संख्येने, व्यापारी, नागरिक, कर सल्लागार, तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेनंतर लगेच जीएसटी कर कायदे विषयक जैन यांनी प्रत्येक्षपणे संवाद साधून सर्वांचे प्रश्न ऐकून घेतले. तसेच चर्चेतून सर्वांना समाधानकारक उत्तरे देत जीएसटी बाबत माहिती सांगितली, व या कर कायद्यातील असलेला संभ्रम त्यांनी दूर केला.

Web Title: 'GST' legal guidance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.