जालन्यात पुन्हा जीएसटी घोटाळा; शासनाला ११ कोटींचा गंडा
By सुमित डोळे | Published: January 10, 2024 04:14 PM2024-01-10T16:14:25+5:302024-01-10T16:14:50+5:30
दोन दिवसांपूर्वी या पथकाने जालन्यातून मेसर्स माईको एंटरप्रायजेसच्या मालकाला अशाच घोटाळ्यात अटक केली होती.
छत्रपती संभाजीनगर : बनावट जीएसटी बिले तयार करून कोट्यवधींच्या घोटाळ्यात जालन्याच्या आणखी एका व्यावसायिकाला मंगळवारी अटक करण्यात आली. एस. आय. अग्रवाल असे त्याचे नाव असून, भारीजा ट्रेडर्सचा तो मालक आहे.
दोन दिवसांपूर्वी या पथकाने जालन्यातून मेसर्स माईको एंटरप्रायजेसच्या मालकाला अशाच घोटाळ्यात अटक केली होती. आरोपींनी ही फर्मच बनावट उभी केली. ही फर्म विविध प्रकारच्या वस्तूंच्या व्यापाऱ्यांसाठी जीएसटीमध्ये नोंदणीकृत होती. या फर्ममार्फत आरोपींनी ४२ कोटी ७१ लाख रुपयांची बनावट बिले प्राप्त करून आयटीसीद्वारे ९ कोटी १९ लाखांचा घोटाळा केला. सदर फर्म ही बनावट असून, केवळ कागदोपत्री व्यवहार केल्याचे तपासात नंतर निष्पन्न झाले. अग्रवालने ११ कोटींचा घोटाळा केल्याचे सूत्रांनी सांगितले.