गच्छाधिपति आए हैं, नई रोशनी लाए हैं....
By Admin | Published: June 5, 2016 11:42 PM2016-06-05T23:42:00+5:302016-06-05T23:51:59+5:30
औरंगाबाद : रविवारी सकाळी ६.३० वाजता गच्छाधिपती आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांचे महावीर चौक येथे आगमन झाले आणि उपस्थित जैन बांधवांनी एकच जल्लोष केला...
औरंगाबाद : रविवारी सकाळी ६.३० वाजता गच्छाधिपती आचार्य विजय अभयदेवसुरिश्वरजी महाराज यांचे महावीर चौक येथे आगमन झाले आणि उपस्थित जैन बांधवांनी एकच जल्लोष केला... ‘गच्छाधिपति आए हैं, नई रोशनी लाए हैंै’ असा जयघोष करीत स्वागतयात्रा कर्णपुरा येथील जैन मंदिरात पोहोचली.
प्रसंग होता, शहरात ५ ते १८ जूनदरम्यान आयोजित अभय महामहोत्सवाचा. यानिमित्ताने नऊ वर्षांनंतर आचार्य शहरात आले. मोक्षरत्नविजयजी म. सा., साध्वी प्रज्ञाश्रीजी म. सा., साध्वी पद्मरेखाश्रीजी म. सा., साध्वी डॉ.जयदर्शिताश्रीजी म. सा. आदी साधू-साध्वीजींनी शहरात प्रवेश केला. महावीर चौक येथे महावीर स्तंभ येथून स्वागतयात्रेला सुरुवात झाली. स्वागतयात्रा कर्णपुऱ्यातील मुनिसुव्रत जैन मंदिर येथे पोहोचली. संचालन संजय संचेती यांनी केले. यावेळी किशनचंद तनवाणी, अभय महोेत्सव समितीचे अध्यक्ष आ. सुभाष झांबड, महावीर पाटणी, रवी मुगदिया, संपतराज देवडा, जव्हेरचंद डोसी, कनकमल सुराणा, रतिलाल मुगदिया, विजयराज संघवी, शरद शहा व समाजबांधव हजर होते.
आज महामांगलिक
गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त सकल विश्वशांती, मानव जीवन उद्धारासाठी ६ जून रोजी महामांगलिकचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.३० वाजता आचार्यश्रींच्या प्रवचनाला सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी देश-विदेशातून दीड ते दोन हजार भाविक येणार आहेत. कर्णपुरा येथील मैदानात मोठे मंडप उभारण्यात आले आहेत.
कर्णपुऱ्यात आज रक्तदान शिबीर
गुरू रामजन्म शताब्दी वर्षानिमित्त अभय मांगलिक मंडळ स्थानिक शाखेच्या वतीने ६ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्णपुरा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश झांबड यांनी दिली.