गेस्ट रूम.............

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:04 AM2021-07-04T04:04:06+5:302021-07-04T04:04:06+5:30

आता फक्त गरज आहे ती येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्व सुविधा देण्याची. जगभरातील उद्योजक औरंगाबादेत गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतील, ...

Guest Room ............. | गेस्ट रूम.............

गेस्ट रूम.............

googlenewsNext

आता फक्त गरज आहे ती येथील विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सर्व सुविधा देण्याची. जगभरातील उद्योजक औरंगाबादेत गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतील, तर त्यांना त्यांच्या देशातून थेट औरंगाबादेत येता आले पाहिजे. सध्या त्यांना मुंबई, चेन्नई, हैदराबाद सारख्या ठिकाणी मुक्काम करावा लागतो व मग दुसऱ्या दिवशी ते औरंगाबादेत येतात. एवढा वेळ वाया घालवण्याची त्यांची मानसिकता नसते. त्यामुळे औरंगाबादेत उद्योग सुरू करण्यासाठी विदेशी गुंतवणूकदार तयार होत नाहीत. या उणिवा लक्षात घेऊन येथील ‘डीएमआयसी’ला यशस्वी करायचे असेल, तर शासनाने सर्वप्रथम औरंगाबाद विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ दर्जाच्या सर्व आवश्यक सुविधा व सेवा लवकरात लवकर द्याव्या लागतील. हे जर झाले, तर आपोआप पर्यटनही मोठ्या प्रमाणात वाढेल. विदेशी पर्यटक वाढले, तर स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल. याप्रकारे या शहराचा मोठा बदल झालेला दिसेल.

याच बरोबर येथे एक-दोन महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था सुरू झाल्या, तर हे शहर महाराष्ट्रात महानगरासाठी पुढचा दावेदार असेल.

- रिषी बागला,

माजी अध्यक्ष, औरंगाबाद फर्स्ट.

Web Title: Guest Room .............

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.