बाजरी महोत्सवात कुलगुरूंनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:05 AM2021-03-15T04:05:11+5:302021-03-15T04:05:11+5:30

बाजरी पिकाचे क्षेत्र वाढून उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धन करून त्याची साखळी अधिक बळकट करणे आवश्यक आहे. बाजरी पिकाचे मूल्यवर्धन करून त्याचे ...

Guidance given by the Vice-Chancellor at Bajra Mahotsav | बाजरी महोत्सवात कुलगुरूंनी केले मार्गदर्शन

बाजरी महोत्सवात कुलगुरूंनी केले मार्गदर्शन

googlenewsNext

बाजरी पिकाचे क्षेत्र वाढून उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धन करून त्याची साखळी अधिक बळकट करणे आवश्यक आहे. बाजरी पिकाचे मूल्यवर्धन करून त्याचे ग्राहकांच्या मनावर महत्त्व बिंबविणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठ आणि कृषी विभागाने एकत्र येऊन शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. असे रामेश्वर ठोंबरे यांनी सांगितले.

दिवसेंदिवस बाजरीचे क्षेत्र कमी होत असताना त्याचे महत्त्व वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने या पिकांचा समावेश पौष्टिक तृणधान्ये पीक म्हणून केला आहे. करंजी बाजरी पिकामध्ये लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे आदिवासी भागातील महिला, लहान मुले यांनी आपल्या आहारात समावेश केला आहे. यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. यावेळी डॉ. दत्तप्रसाद वासकर, संशोधक डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. गजेंद्र जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, नानासाहेब कुंदे यांची उपस्थिती होती.

Web Title: Guidance given by the Vice-Chancellor at Bajra Mahotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.