...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
By बापू सोळुंके | Published: September 29, 2024 07:50 PM2024-09-29T19:50:36+5:302024-09-29T19:51:44+5:30
निवडणूक लढायची कि पाडायचं हे २४ ऑक्टोबरला सांगू
छत्रपती संभाजीनगर : गुज्जर, पटेल यांचं आंदोलन तुम्ही कसेही हाताळाले असेल पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे. तुम्ही चांगल्या भूमिकेतून आंदोलन हाताळणार असाल तर ठीक आहे. पण आरक्षण न देता आंदोलन हाताळू पहात असाल तर ही शाह यांची मोठी चूक ठरेल, असा थेट इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
नऊ दिवसांच्या उपोषणामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे बुधवार रात्रीपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमित शाह यांचा नुकताच छत्रपती संभाजीनगरचा दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी आंदोलने होतच राहतात. ते कसे हाताळायचं हे आम्हाला माहिती आहे, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले.
शाह यांच्या या विधानाकडे जरांगे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, ते काय उद्देशाने बोलले ते माहीत नाही. चांगल्या भूमिकेने आंदोलन हाताळणार असाल तर ठीक आहे. जर मराठा कुणबी एकच असल्याचा कायदा केला तर ते त्यांना परवडेल. मराठ्यांना आरक्षण दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कुणी रोखू शकत नाही. अन्यथा चहा प्यायची वेळ येईल. तुमची आंदोलन हाताळायची पद्धत मला चांगली नाहीत आहे. मी सगळ्या अंदोलनाचा अभ्यास केला. आरक्षण न देता आंदोलन हाताळू म्हणत असाल तर ही शाह यांची मोठी चूक होईल. गुज्जर, पटेल यांच्या आंदोलना प्रमाणे हाताळून तर बघा, असे आव्हानच त्यांनी दिले. निवडणुक जवळ आल्यावर आणि आंदोलनाला १३ महिने झाल्यावर तुम्ही आंदोलनावर बोलता,असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
निवडणूक लढायची कि पाडायचं हे २४ ऑक्टोबरला सांगू
मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात २८८ उमेदवार उभे करण्याचे आवाहन तुम्हाला दिले आहे, याकडे तुम्ही कसे पाहता असे विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक लढवायची की नाही ते वेळ आल्यावर सांगू. .सगळं मलाच पाहजे या इर्षेचा भुजबळ सारखा माणूस नाही. धनगर समाजाची एस.टी. प्रवर्गातून आरक्षणाची मागणी योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपाला मराठा, गुज्जर, मुसलीम यांना मोठ्या जाती संपवायचा आहे. पटेल गुज्जर जाट लोकांचं आंदोलन मोडून काय मिळवलं तुम्ही? हे अधिक दिवस चालत नाही. तुमची हाताळायची पद्धत सगळ्या माहित सगळे कंटाळले आहे.काम करण्याची खुनशी वृत्ती तुम्हाला संपवणार आहे.
नारायणगडावरील दसरा मेळावा परंपरेचा
दसरा मेळाव्यासंदर्भात गड काय ठरवेल ती भूमिका महत्वाची आहे. गडाची भूमिका राजकीय नाही. तिथे परंपरेचा दसरा मेळावा असतो. जातीचा किंवा राजकारणाचा नाही. मी त्या मेळाव्यात जा जाऊन आशीर्वाद घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.