गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत

By साहेबराव हिवराळे | Published: August 18, 2023 09:52 PM2023-08-18T21:52:23+5:302023-08-18T21:52:43+5:30

अंबिकानगर ते एअरपोर्ट परिसर : रस्ते चिखलमुक्त; पण नाला पावसाळ्यात धोकादायक

Gunthewari Ward now has the 'look' of an elite colony; One day, one colony | गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत

गुंठेवारी वॉर्डाला आता उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’; एक दिवस, एक वसाहत

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडलगत असलेल्या अंबिकानगर, लोकशाही कॉलनी, संतोषीमातानगर, न्यू एसटी कॉलनीत रस्ते चिखलमुक्त झाले आहेत. एकेकाळी पत्र्याचे शेड दिसणाऱ्या घरांच्या जागी टोलेजंग इमारतींमुळे परिसरास उच्चभ्रू वसाहतीचा ‘लूक’ आला आहे; पण सांडपाण्याच्या नाल्याला रिटर्निंग व्हॉल्व्हची उणीव भासत असल्याने पावसाळ्यातील धोकादायक स्थिती मात्र आजही कायम आहे.

सेवासुविधा व पक्क्या बांधकामांमुळे परिसर उजळून दिसत आहे. तत्कालीन नगरसेवक मंदा काळुसे, मोतीलाल जगताप, नारायण कुचे, कमल नरोटे, भाऊसाहेब जगताप यांनी विकासकामांसाठी प्रयत्न केलेले आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकडे, पेव्हर ब्लॉक, वीज, पाण्याची व्यवस्था आहे. मनपा आयुक्तही भेट देऊन गेले आहेत.

धोकादायक नाल्याची उंची वाढविण्याची गरज मुकुंदवाडीतून संतोषीमातानगरकडे जाताना आरोग्य केंद्रालगत नाल्यावर बनविलेल्या पुलाजवळ दूरवरून येणाऱ्या पाण्याचा लोंढा गुडघाभर वाहतो. रिटर्निंग व्हॉल्व्हची गरज आहे. - भाऊसाहेब नवगिरे

आरोग्य केंद्राला हवी मोठी जागा

अनेक समस्या प्रयत्नाने व लोकप्रतिनिधींच्या निधीचा उपयोग करीत सोडविण्यात आलेल्या आहेत. गरजूंना मदतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असतात; पण आरोग्य केंद्राला अपूर्ण जागेत सेवा द्यावी लागते. मोठ्या जागेसाठी प्रयत्न सुरू आहेत. - माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप

पुलामुळे रहदारीचा प्रश्न निकाली

घराला खेटून आलेल्या नाल्यामुळे आम्हाला नाला ओलांडणे शक्य नव्हते. पुलामुळे रहदारीचा प्रश्न निकाली निघाला आहे. पुढे एका ठिकाणी नाल्यावर टाकण्यात आलेल्या स्लॅबमुळे परिसरातील रहिवाशांची सोय झाली आहे.- इसाक पठाण (प्रतिक्रिया)

रस्ते गुळगुळीत

मुकुंदवाडीकरांना सिडकोने जमिनीच्या बदल्यात दिलेल्या जमिनीत सिमेंट रस्ते, दिवे लावले. जमिनींचे भाव झपाट्याने वाढले असून, बंगले उभे राहत आहेत. पायलटबाबानगरी उच्चभ्रू वसाहत दिसू लागली आहे. जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. विकासकामांची गती कायम असावी. - रेखा पवार

संतोषीमाता नगर, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, पायलटबाबा नगरीत मोकाट जनावरे घराच्या आवारात घुसून नुकसान करीत आहेत. जनावरांना बंदिस्त करण्याच्या मनपाच्या सूचना असतानाही दुर्लक्ष केले जाते. स्वच्छ वॉर्डात अस्वच्छता पसरविण्याचा प्रकार होत आहे. वराह व कुत्र्यांकडून हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे वाहनांचे अपघातही होत आहेत.- संतोष शेंगुळे पाटील.

Web Title: Gunthewari Ward now has the 'look' of an elite colony; One day, one colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.